Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : रिसोडमध्ये वादळी वाऱ्याने मोठे नुकसान

Rain Damage : केनवड या भागात मंगळवारी (ता. २३) आणि बुधवारी (ता. २४) आलेल्या वादळामुळे केनवड व कळमगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले.

Team Agrowon

Washim News : केनवड या भागात मंगळवारी (ता. २३) आणि बुधवारी (ता. २४) आलेल्या वादळामुळे केनवड व कळमगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले. नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मंगळवारी आणि बुधवारी रिसोड तालुक्यात वादळवाऱ्याने थैमान घातले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड होऊन काही शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तांनाही हानी पोहोचली.

यामध्ये केनवड येथील शेतकरी कमल सुधीर गोळे, रवींद्र साहेबराव गोळे, कमल श्यामराव केनवडकर, नंदकिशोर वानखेडे, नंदा विजय गोळे आणि कळमगव्हाण मधील पुरुषोत्तम नारायण जाधव, विद्याधर भास्कर पांडे, विजय भाऊराव शिंदे,

एकनाथ लक्ष्मण अंभोरे यांच्या विहिरीवर लावलेल्या सौर ऊर्जा पॅनेलचे नुकसान झाले. केनवड आणि कळमगव्हाण येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरपंच-उपसरपंच, सदस्यांसह प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marketing Minister Jayakumar Rawal: फुलबाजारासाठी मुंबईत जागा शोधा : पणनमंत्री रावल

Urea Shortage: संभाजीनगरमध्ये युरियाचा पुरवठा कमी

Mumbai Housing: हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती : मुख्यमंत्री

Agriculture Department: ‘ठिबक’साठी सहा कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Cow Protection: पोलिसांच्या परिपत्रकाने कथित गोरक्षकांना रान मोकळे

SCROLL FOR NEXT