Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : वाशीम जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत द्या

Heavy Rain Crop Loss : रिसोड तालुक्यातील पिंपरी, कुकसा, जोगेश्वरी आंचळ, नेतन्सा, जाखेडा, तपोवन तथा बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात बुधवार (ता. २५) आणि गुरुवारी (ता. २६) झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा रिसोड बाजार समितीचे सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत भुतेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाशीम जिल्ह्यात दोन दिवस संततधार अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली असल्यामुळे अति पावसाने पेरणी झालेले क्षेत्र खरडून गेले. त्याचबरोबर नदी नाल्याच्या काठावरील शेती पूर्णपणे अतिवृष्टीने खरडून गेली.

झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील फळपिके, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागातील शेतक-यांचे शेतातील ठेवलेले साहित्य वाहून गेले. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासाठी शासनाने सर्वे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयाची तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पालकमंत्री दत्ता भरणे, जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन दिले.

पूरग्रस्त भागाची पाहणी

रिसोड तालुक्यातील पिंपरी, कुकसा, जोगेश्वरी आंचळ, नेतन्सा, जाखेडा, तपोवन तथा बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. अचानक आलेल्या पावसाने परिसर पूर्णपणे जलमय झाला होता.

पावसाने झालेल्या या नुकसानाची विष्णूपंत भुतेकर पदाधिकाऱ्यांसह शनिवारी (ता.२८) पाहणी केली. पिके वाहून गेलेली असून शेतातील सिंचन साहित्यही वाहले. सौर ऊर्जेचे पॅनेल, विजेचे खांब वाहून गेले. रस्ते उखडले आहेत. सरकारने मदत न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: ५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान! ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

Mango Season: तुम्हाला तुमच्या झाडाचे आंबे खायचे आहेत का...

Traditional Food Culture: वरण-भात आणि खाद्यसंस्कृती

Women in Agriculture: स्त्रियांच्या अधिकाराला अंधश्रद्धेचा विळखा

Interview with Dr Jitendrakumar Kadam: महाराष्ट्रातील हळदीला जागतिक संधी

SCROLL FOR NEXT