Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढला

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या भागांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत बुलडाण्यातील जांभूळधाबा येथे सर्वाधिक १२५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचल्याने ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तर काही ठिकाणी जमिनीही खरडल्या आहेत.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. बुलडाणा आणि अमरावतीत सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे कापूस पिकांना दिलासा मिळाला आहे. बुलडाण्यातील जांभूळधाबा मंडलानंतर धामनगाव, पिंपळगाव मंडलात १०६ मिलिमीटर पाऊस झाला. तर अमरावतीतील दर्यापूर मंडलात १०२ मिलिमीटर पाऊस झाला.

वर्ध्यातील वाढोणा येथे १२० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अकोल्यातील माना येथे ८९ मिलिमीटर, तर आगर येथे ८१ मिलिमीटर पाऊस झाला. वाशीममधील धनज येथे ४० मिलिमीटर, हिवरा, कामरगाव येथे ५४ मिलिमीटर, नागपूरमधील जलालखेडा, मेंधळा येथे ५४ मिलिमीटर, पाचखेडी येथे ४९ मिलिमीटर, भंडाऱ्यातील सावर्ला येथे ६६ मिलिमीटर, चंद्रपूरमधील नागभीड येथे ४५ मिलिमीटर, तर तालोधी ५०, मिढाळा, गडचांदूर येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामध्ये निमगाव येथे ७२ मिलिमीटर, तर विरगाव ६३, नवी बेज ४०, नांदगाव ६२, वेहेळगाव येथे ५१ मिलिमीटर पाऊस झाला. नगरमधील नेवासा बु. येथे ४४ मिलिमीटर, दहिगाव येथे ४७ मिलिमीटर, पुण्यातील अष्टापूर येथे ४९ मिलिमीटर, यवत येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात हलक्या सरी पडल्या.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. यामध्ये नसिराबाद येथे ८७ मिलिमीटर, तर भुसावळ ६७, वरणगाव ५१, कुऱ्हे ६८, पिंपळगाव, करंजी ५०, यावल येथे ६९ मिलिमीटर पाऊस झाला. तर धुळेतील नगाव येथे ६७ मिलिमीटर, तर लामकाणी ५५, अर्थे, जवखेडे ४२, चिमठाणा, शेवडे येथे ५५ मिलिमीटर, नंदुरबारमधील वडाळी येथे ८१ मिलिमीटर, तर ब्रह्मपुरी येथे ४८ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे धरणात अजूनही काही प्रमाणात आवक सुरू आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. यामध्ये शेंदूरवाडा येथे ९४ मिलिमीटर, तर बाळानगर ५६, गंगापूर ६१, मांजरी ६०, भेंडाळा ४८, तुर्काबाद ५६, वाळूज ७०, जामगाव ८१, महालगाव ७१, नागमठाण ४५, कन्नड, चापनेर ५३, देवगाव ७५, पिशोर येथे ६९ मिलिमीटर, तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, सिपोरा येथे ६२ मिलिमीटर, तर पिंपळगाव ४६, वरूड येथे ४१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात कडक ऊन होते. तर अधूनमधून शिडकावा झाल्याने पिकांना आधार मिळाला.

कोकणात पावसाचे प्रमाण कमी असले तरी रायगडमधील माणगाव येथे हलका पाऊस पडला. तर रत्नागिरीतील आंजर्ले येथे ४५ मिलिमीटर तर वेळवी ३८, कोतवडे ३९, दापोली ३८, तुळसानी येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी शिडकावा झाला.

शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

पश्‍चिम महाराष्ट्र : जातेगाव ४३, बनगाव ४६, पिंपळगाव ४३, राजापूर ४६, फैजपूर ४४, भालोद ५५, खिरोदा, सावदा, खिर्डी ४४, निंभोरा, ऐनपूर ५६, मुक्ताईनगर ५१, गोरगावले ६७, चहार्डी ६०, चाळीसगाव ७१, मेहुणबारे, खडकी ७२, हातले ५५, फत्तेपूर ४१, मालदाभाडी, बोदवड, नगरदेवळा ५७, नांदगाव ५९,

विदर्भ : जळगाव, जामोद ७८, आसलगाव ६०, संग्रामपूर ४१, सोनाळा, बावनबीर ६०, चिखली ५२, उंद्री ४७, हातणी ५८, चांदई ४३, बुलडाणा ५०, रायपूर ६१, धाड ५७, पाडळी ९८, म्हसला ६१, साखळी ४४, पी राजा ५६, लाखनवाडा ४८, हिवखेड ५६, काळेगाव ८२, आवार ५८, अटाळी ६४, अडगाव ५४, वझर ४६, पारखेड ६३, माटरगाव ५४, जलंब ४८, जवळा ५०, नरवेल ६५, नांदूरा ९६, वडनेर ४५, निमगाव ४६, महाळुंगी ७९, चोहोट्टा ७५, कुटासा ४५, हिवरखेड ५२, अडगाव ४९, बाळापूर ४६, हातरुण ५०, पातूर ४०, अकोला ४१, दहिहांडा ५१, उगवा ५७, राजंदा ४३, खेर्डा ४१, जामठी ४७, चिखलदरा ४८, वाळगाव ४३, दवरगाव ४५, शिरळा, भातकुली ४४, पूर्णानगर ४६, आष्टी ४३, निंभा ५७, खोलापूर ५२, दाभा ५८, शिवणी ८४, पापळ ४३, लोणी ६०, पळसखेड ६२, मोर्शी ४३, हिवरखेड ४५, बेनोडा ४६, वाठोदा ५४, खाल्लार ६४, रामतीर्थ ८९, सामदा ९७, थिलोरी ५६, येवदा ५९, अंजनगाव ४९, कोकर्डा ५५, अचलपूर ५८, रिसेगाव ७५, पारसपूर ४९, पाथरोट ५१, परतवाडा ४८, चांदूर ५०, करजगाव ४७, तळेगाव ८३, शिरजगाव ४५, चिंचोली ४०, दत्तपूर ६२, रोहणा ४८, करंजा ५५, सारवडी ८५, ठाणेगाव ४४, वर्धा, वायफड, सेवाग्राम ४५, सिल्लोड, वायगाव ४१, देवळी ४१, पुलगाव ६२, विजय गोपाल ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT