Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : परभणी जिल्ह्यातील २ मंडलांत अतिवृष्टी

Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांमध्ये बुधवारी (ता. १७) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांमध्ये बुधवारी (ता. १७) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील महातपुरी (ता. गंगाखेड) मंडलात ६८.५ मिमी व आवलगाव (ता. सोनपेठ) मंडलात ९३.५ मिमी अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिला.

गेल्या ३-४ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जमिनीतील ओलाव्यात वाढ झाली आहे. परंतु अजूनही या दोन जिल्ह्यांतील २७ मंडलांमध्ये आजवर अपेक्षित सरासरीहून कमी पाऊस आहे. परिणामी ओढे, नाले तसेच नद्या प्रवाहित झाल्या नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. परभणी जिल्ह्यातील ४९ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १९.२ मिमी, जुलै महिन्यात सरासरी १३९.१ मिमी, यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ३९० मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडलांमध्ये हलका पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ४.३ मिमी, जुलै महिन्यात सरासरी १५६.२ मिमी, यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ३०५.७ मिमी पाऊस झाला.

२७ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस...

परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २७ मंडलांमध्ये १ जूनपासून आजवर अपेक्षित सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. त्यात पेडगाव (७४.५ टक्के), सिंगणापूर (७९.९), पिंगळी (६६.२), परभणी ग्रामीण (७०.३), देऊळगाव गात (९७.४), वालूर (७५.७), हादगाव (९२.६), कासापुरी (९५.३), पूर्णा (९८.७), कात्नेश्‍वर (९१.९), कावलगाव (९४.८), डिग्रस कऱ्हाळे (८६ टक्के), खंबाळा (९३.५), आखाडा बाळापूर (७२.५), डोंगरकडा (८३.५), वारंगा (८९), वसमत (६५.३), हयातनगर (५९.७), गिरगाव (७४.७), हट्टा (७६), टेंभुर्णी (८१.३), कुरुंदा (८३.७), औंढा नागनाथ (८९.२), साळणा (८९.४), गोरेगाव (९९.९), आजेगाव (९६.१), साखरा (९६ टक्के).

मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः दैठणा ३९, बोरी ५४, सेलू २४.५, चिकलठाणा ६४.३, मोरेगाव ३७.८, केकरजवळा १०.८, रामपुरी १३.३, बाभळगाव १२.८, सोनपेठ ५१.५, आवलगाव ९३.५, शेळगाव ३६, वडगाव ५१, गंगाखेड ३३.८, महातपुरी ६८.५, माखणी २०.८, पिंपळदरी ३७, पालम १४.५, चाटोरी १९, पेठशिवणी १०.३, रावराजूर १४.३, पू्र्णा ४५, ताडकळस २८, लिमला २४.८, चुडावा ३७.८, कावलगाव ५१.३. हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर २३.३, येळेगाव १०.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT