Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : अतिपावसाचा खरीप पिकांना फटका

Kharif Crop : गेल्या तीन महिन्यांपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

Team Agrowon

Patan News : गेल्या तीन महिन्यांपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. त्याचा भात पिकाला फायदा झाला असून, काही ठिकाणी अतिपावसामुळे सोयाबीन, भुईमूग व कडधान्य या खरीप पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाटण तालुक्यात सुरुवातीला पाऊस वेळेवर आल्यामुळे पेरण्या चांगल्या झाल्या, तसेच थोडी उसंत घेत पुन्हा बसरल्याने पिके तेजीत उगवली आहेत. पिके चांगली असली तरी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतात भांगलण, कोळपणी झाली नसल्याने विविध प्रकारच्या तणांनी मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस होत असल्याने डोंगरातील नाळवे चालू झाले आहेत. धूळवाफेवर पेरणी केलेली भात, डोंगर उताराला ओघळाच्या पाण्यावर केलेले रोप भात पिके समाधानकारक आहेत.

शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडून कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, कडधान्य पिके अडचणीत आली आहेत. सोयाबीनला काही ठिकाणी अतिपावसाचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT