Crop Damage Flood agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीचा ८४ हजार शेतकऱ्यांना तडाखा

Heavy Rain : जुलै महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. तब्बल ५५ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

Team Agrowon

Chandrapur News : जुलै महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. तब्बल ५५ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जिल्ह्यातील एक हजार ३५९ गावांतील ८४ हजार ३२२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून महिन्याच्या अगदी सुरवातीला पावसाने जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. त्यानंतर थोड्याबहुत प्रमाणावर काही भागात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून टाकल्या. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत दिली. पावसाच्या दिवसांत ऊन तापू लागल्याने पिके करपू लागली होती.

पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना जून महिन्यातच दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या. शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत होते. जुलै महिना लागताच पावसाने आपला रंग दाखविला. पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. मात्र, १७ जुलैनंतर जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. कमी जास्त आठवडाभर हा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले होते.

संततधार पावसाने नदी फुगल्या. जिल्ह्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात पिके वाहून गेली. काही ठिकाणी जमीन खरवडून निघाली होती. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता प्रशासनाने सर्वेक्षणाचे आदेश कृषी, महसूल विभागाला दिले होते.

जुलै महिन्यात सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून, जुलै महिन्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे ५४ हजार ५५६.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामुळे ८४ हजार ३२२ शेतकरी बाधित झाले. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजाला आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT