Shirala Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Shirala Rain: मोरणा धरण, शिवणी, टाकवे तलाव भरले

Morana Dam: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पश्‍चिम भागात सहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा चांदोलीत ३२५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे.

Team Agrowon

Sangali News: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पश्‍चिम भागात सहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा चांदोलीत ३२५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे.

शिराळा येथील मोरणा धरण, शिवणी येथील शिवणी आणि शिराळा उत्तर भागातील टाकवे तलाव पूर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे.मोरणा धरणाची पाणी साठवण क्षमता पाऊण टीएमसी असून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे.

त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत वर्षी मोरणा धरणात केवळ ११ टक्के पाणीसाठा होता. आजअखेर शिवणी येथील तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. टाकवे येथील टाकवे तलाव १०० टक्के भरला असून, गतवर्षी याच तलावात १५ टक्के पाणीसाठा होता.

मात्र यंदा एप्रिल ते मे दरम्यान वाकुर्डे योजनेचे पाणी मोरणा धरण व शिवणी तलावात सोडल्याने आधीचा पाणीसाठा व आता पडलेल्या पावसामुळे धरण व तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. ारणा धरणासह पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे.

चांदोलीत २४ तासांत ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ८.३३ टीएमसी (२४.२१ टक्के) पाणीसाठा वाढला आहे. धरणात पाण्याची आवक ११ हजार ३६४ क्युसेकने सुरू असल्याने धरणाच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे.

धरणात १८.८३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. वारणा जलविद्युत प्रकल्पातून १६४० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गत वर्षी जूनमध्ये आजअखेर २०४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा ५६९ मिलिमीटर पाऊस झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३६५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे.

यंदाचा पाणीसाठा (कंसात गत वर्षीचा साठा टक्केवारीत)

मोरणा मध्यम प्रकल्प ः १०० (११ ), ल.पा. तलाव वाकुर्डे बुद्रुक ः १०० (८८), ल.पा. तलाव अंत्री बुद्रुक ः १०० (२९), ल.पा. तलाव शिवणी ः १०० (०), ल.पा. तलाव टाकवे ः १००(१५), ल.पा. तलाव रेठरे धरण ः १०० (२), ल.पा. तलाव कार्वे ः ३३ (९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT