Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Nanded : नांदेड जिल्ह्यातील १७ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी

Monsoon Rain : नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ३९.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील १७ महसूल मंडलांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ३९.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील १७ महसूल मंडलांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. काही भागांत ८८.२५ मिमीपर्यंत अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ९३ महसूल मंडलांपैकी ही १७ मंडले अतिवृष्टीग्रस्त ठरली आहेत. सर्वाधिक पावसाची नोंद मुधखेड तालुक्यातील मुधखेड व मुगट या मंडळांमध्ये प्रत्येकी ८८.२५ मिमी झाली. त्याचप्रमाणे लिंबगाव (८४.२५ मिमी), बारड (८१.५० मिमी), तुप्पा, वसरणी, तरोडा, वजेगाव, नांदेड ग्रामीण व कापसी या मंडळांमध्येही ८१.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पिकांचे नुकसान होण्याची शक्यता...

या अतिवृष्टीमुळे काही भागात शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाच्या पुढील स्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अतिवृष्टी झालेली महसूल मंडले (मिलिमीटर)

नांदेड शहर ७७.२५, नांदेड ग्रामीण ७९.५०, तुप्पा ८१.२५, वसरणी ८१.२५, विष्णुपुरी ७९.५०, लिंबगाव ८४.२५, तरोडा ८८.००, वाजेगाव ८१.२५, नाळेश्वर ८२.००, कापसी ८१.२५, भोकर ६६.७५, मोंघाळी ६६.५०, मुदखेड ८८.२५, मुगट ८८.२५, बारड ८१.५०, दाभड ७९.५०, मालेगाव ७३.२५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT