Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Flood In Yavatmal : यवतमाळपाठोपाठ बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे हेलीकॉप्टर

Vidarbha Rain News : विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस कोसळत आहे. बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Yavatmal Rain Update : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यभरात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून विदर्भात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ आणि बुलढाण्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकाॅप्टर पाचरण करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. संग्रामपूर व जळगाव-जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांवरील पूल वाहून गेल्याने १४० गावांचा संपर्क तुटला. तसेच अनेकांना पाण्याने वेढा दिल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बुलढाण्यातील पांडव नदीचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. पूरात सुमारे १२० नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. पुराच्या पाण्यात आतापर्यंत ३ व्यक्ती पुरात वाहून गेल्या आहेत. त्यांचे शोध कार्य सुरू आहे.

यवतमाळमध्ये एका दिवसात २३२ मी.मी पाऊस पडला. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नागरिकांनी भीतीपोटी छतावर चढून रात्र काढली. बोरी तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे दहीसावळी तालुका महागाव येथील पुलावरून पंधरा फूट पाणी वाहत आहे. बोरगाव डॅम पूर्णतः भरला पायथ्या लागत असलेल्या घराला पाण्याचा वेढा पडला. या पुरात ४५ जण अडकले असून भारतीय हवाई दल रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे. महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तसेच एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून मदत कार्य सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये पुरामुळं शेतीच मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT