Sindhudurg Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्गात सकाळच्या सत्रात पावसाचा जोर; दुपारनंतर ऊन

Today Rain Update : काही भागांत जोरदार पाऊस झाला. सोमवार पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Weather Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी (ता. २६) सकाळच्या सत्रात पावसाचा जोर राहिला. मात्र दुपारनंतर सर्व जिल्ह्यात ऊन पडले. पावसामुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

जिल्ह्यात २३ जूनला पावसाचे पुनरागमन झाले. जिल्ह्यात सर्व भागांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारी (ता. २५) दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या.

काही भागांत जोरदार पाऊस झाला. सोमवार पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला.

सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांमध्ये सरीवर सरी कोसळत होत्या. सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत काही भागांत पाऊस सुरू होता. परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. दुपारनंतर पावसाचा जोर पूर्णतः कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागात ऊन पडले होते.

दरम्यान दोन दिवस पावसाच्या चांगल्या सरी बरसल्यामुळे शेतीच्या कामांना चांगली गती आली आहे. रखडलेल्या भात रोपवाटिकांची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली असून नांगरणीचे कामदेखील सुरू केले आहे.

दुपारनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सायकांळी उशिरा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT