Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

Rain Alert : नांदेड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारीही (ता. १) मुसळधार पाऊस झाला.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारीही (ता. १) मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस नांदेड, मुखेड, लोहा, हदगाव, देगलूर, मुदखेड, अर्धापूर व नायगाव या तालुक्यांसह तब्बल ४५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सोमवारी (ता. ३) सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत सरासरी ७६ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस २४ मंडलांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी झालेला पाऊस विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यात सर्वाधीक होता. या भागातील हदगाव, भोकर, किनवट, माहूर, हिमायतनगर या तालुक्यांसह तब्बल २६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. या पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांसह हळद, केळी, भाजीपाला या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर २१ जनावरांचाही यात मृत्यू झाला होता. दरम्यान पावसाचे प्रमाण शनिवारपेक्षाही रविवारी अधिक होते.

गोदावरी नदीतही पाण्याचा येवा वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोमवारीही जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तांचे नुकसान वाढण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यात आजवर झालेल्या पावसामुळे एकूण ७४२.८० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ८३.३४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टी झालेली मंडल

नांदेड शहर ११८, नांदेड ग्रामीण १२४.७५, तुप्पा १०३.७५, वरसणी १०३.७५, विष्णुपुरी ११२.५०, लिंबगाव १५४, तरोडा १४८.७५, वाजेगाव १३५, नाळेश्‍वर ११२.२५ (नांदेड तालुका) बिलोली ६५.७५, आदमपूर ७०.७५, लोहगाव ६५.७५ (बिलोली तालुका) जांब ९६.२५, बाऱ्हाळी १०२.५०, मुक्रमाबाद ९९.५०, आंबुलगा ७६ (मुखेड तालुका) कुरुळा ८३.५०, दिग्रस बुद्रुक ८८ (कंधार तालुका) लोहा १५७.२५,

माळाकोळी १०१.५०, कापशी ९७.२५, सोनखेड १५७.२५, शेवडी ११४.५०, कलंबर १५७.२५ (लोहा तालुका) हदगाव ७१, तळणी ७१.५०, मनाठा ११२.५०, पिंपरखेड १०२.२५, आष्टी ७१.२५ (हदगाव तालुका) भोकर ८३.७५ (भोकर तालुका) मरखेल ७४.२५, माळेगाव मक्ता ७१, हाणेगाव ८१.२५, नरगंल बुद्रूक ६९.२५ (देगलूर तालुका) मुदखेड १२९.२५, मुगट १२५.२५, बारड १३७ (मुदखेड तालुका) जवळगाव ७७.५० (हिमायतनगर तालुका) अर्धापूर ७७.५०, दाभड १२६.५० (अर्धापूर तालुका).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT