Heavy Rain in Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain in Koyna Dam : महाबळेश्वरमध्ये २ हजार मिमी पाऊस, कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

Koyna Dam : मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने कोयना धरणात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

sandeep Shirguppe

Heavy Rain Koyna Dam : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने कोयना धरणात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसीने भर पडली आहे.

जलाशयाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कोयनानगर व नवजाच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला होता, तर आज महाबळेश्वरच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला असून, धरण मजबूत स्थितीत पोचले आहे.

बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला तो आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत तसाच टिकून राहिला. गुरुवारी झालेल्या पावसाचे पाणी दऱ्याखोऱ्यातून धरणाच्या साठ्यात आज मोठ्या प्रमाणावर येऊ लागले.

त्यामुळे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पाण्याची दुप्‍पट आवक होत आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, धरणाचा पाणीसाठा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ८९, नवजाला १५६ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पाणीपातळी २१०५.०८ फुटी झाली आहे. गेल्या २४ तासांत जलाशयात ३.४९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, पूर्व भागात गेली दोन दिवस संततधार पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पश्चिम भागात भात लावणी अंतिम टप्प्यात असून, पूर्व भागात मात्र आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत.

अनेक नद्यांना पूर

पश्चिम घाटात होत असलेल्या पावसाने धरण पाणलोट क्षेत्रासह नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. कोल्हापूर, आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी राज्य आणि जिल्हा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT