agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्‍ह्यात जोरदार पाऊस

गेल्या पंधरा दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी (ता. २६) जिल्ह्याला झोडपून काढले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी (ता. २६) जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे पिकांना उभारी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कुंभी, कासारी लघू पाटबंधारे परिसरात अतिवृष्टी झाली आहे.

मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला दुपारी चारपासून दाजीपूर परिसरात सुरुवात झाली. रात्री साडेनऊपर्यंत केवळ पाच तासांत तब्बल १३७ मिलिमीटर पाऊस कोसळला. कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची यंदाची ही पहिलीच वेळ. यामुळे राधानगरी धरण पायथ्याच्या वीजगृहातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणी वाढण्याची शक्यता असून, सध्या धरणाची पातळी ३४७ फूट आहे.

दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या पायथ्याला असलेल्या वीजगृहासाठीही विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. कुंभी आणि कासारी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असेल्याने ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कासारीतून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. हातकणंगले, पुलाची शिरोली, तावडे हॉटेल, कसबा बावडा, शिये, कोल्हापूर शहर आणि त्यानंतर करवीर, गगनबावडा तालुक्यात टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. धरणांच्या पाणलोटात समाधानकारक पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT