Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; पिकांना फटका

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात ११० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, त्यामुळे काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा सप्टेंबरच्या मध्यातच खानदेशात पावसाने एकूण सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारात ११० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाऊस ११२ टक्के एवढा आहे.

जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिलिमीटर, धुळ्याचे ५३५ मिलिमीटर तर नंदुरबारचे पाऊसमान ८६२ मिलिमीटर आहे. या सर्वजिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जळगाव जिल्ह्यात ऑगस्टअखेरीस १०० टक्के पाऊस झाला आहे. तर या महिन्यात काही दिवस पावसाची उघडीप होती. मागील तीन-चार दिवसांपासून खानदेशात हलका ते मध्यम पाऊस येत आहे. सोमवारी (ता. २३) जळगावसह धुळे, नंदुरबारमध्येही पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर आदी भागात पाऊस झाला. सायंकाळी काही भागांत अर्धा ते पाऊणतास मध्यम पाऊस झाला. धुळ्यातही शिरपूर, धुळे तालुक्यातील काही भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. सुरुवातीला जोरदार पाऊस होता. नंतर पाऊस कमी झाला. रात्रीही तुरळक पाऊस सुरू होता.

काढणीवर आलेल्या पिकांची हानी सध्या खानदेशात उडीद, मका, सोयाबीन या पिकांची काढणी, मळणी सुरू आहे. परंतु पावसामुळे या पिकांची मळणी मागील दोन-तीन दिवसांपासून थांबली आहे. त्यात पाऊस येत असल्याने पिकांची हानी होत आहे. अनेक भागात उडीद पिकात पक्व दाण्यांना कोंब फुटले आहेत. त्यात १०० टक्के हानी या पिकांची झाली आहे. हाती आलेला घास पावसाने हिरावला जात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

पीकविमा कंपनीकडून पंचनामेच नाहीत उडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. परंतु या तक्रारी दाखल होऊनही पंचनामे पीकविमा कंपनीने केलेले नाहीत. यामुळे विमाधारक शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोन वेळेस पावसात हानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे नोंदविल्या, परंतु पंचनामेच झालेले नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेर आदी भागांत हा प्रकार घडला असून, याबाबत प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

Marathwada Water Storage : मांजरा, निम्न तेरणा धरणाची नव्वदी पार

Animal Husbandary Department : सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांत ४३ पदे रिक्त

Soybean Procurement : मध्यप्रदेशमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू; महाराष्ट्रात सरकारच्या हालचाली संथ!

Orange Crop Damage : संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

SCROLL FOR NEXT