Gujrat Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : गुजरातमध्ये पावसाचे थैमान

Rain Update : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात सोमवारी (ता. २७) विविध ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Ahmedabad News : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात सोमवारी (ता. २७) विविध ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे. येथील गांधीनगर, खेडा आणि वडोदरा येथे मुसळधार पावसाने भिंत कोसळल्याच्या घटनांमुळे चौघांचा, तर आणंद जिल्ह्यात दोघांचा बुडून आणि झाड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून गुजरातमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, तसेच धरणे भरून वाहू लागल्याने पंचमहाल, नवसारी, वलसाड, वडोदरा, भरूच, खेडा, गांधीनगर आरवली यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सुमारे ६० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार गुजरातमधील विविध भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील ९६ जलाशयांतील पाणीसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

टंकारा येथे ३४७ मिलिमीटर पाऊस

गुजरातमधील बहुतांश भागात १०० टक्के पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी सहा वाजता नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत मोर्बी जिल्ह्यातील टंकारा तालुक्यामध्ये ३४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ही गुजरातमधील मागील २४ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद आहे. त्याखालोखाल पंचमहाल येथे ३४६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच नडियाद येथे ३२७ मि.मी. वडोदरा तालुक्यात ३१६ मि.मी. आणि आणंद येथे ३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुजरातमधील २५१ तालुक्यांपैकी २४ तालुक्यांमध्ये २०० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आणि ९१ तालुक्यांमध्ये १०० पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT