Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Gadchiroli Rain : गडचिरोलीत जोरदार पाऊस

Rain Update : पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. तरीही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. तरीही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भाच्या पूर्व भागात काही अंशी ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील तरडगाव येथे सर्वाधिक १८९ मिलिमीटर पाऊस पडला. तर दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता.

कोकणात पाऊस नसला तरी रायगडमधील बिरवडी येथे २८ मिलिमीटर, तर रोहा, नागोठणे येथे २० मिलिमीटर, रत्नागिरीतील पाचल येथे ३६ मिलिमीटर, तर कुंभवडे ३१, धामनंद ३४, सौंदळ येथे ३२ मिलिमीटर, तर सिंधुदुर्गमधील मडूरा येथे ३३ मिलिमीटर, तर तळवट ३१, फोंडा येथे ३० मिलिमीटर, तर कणकवली, सांगवे, सावंतवाडी, बांदा येथे हलक्या सरी पडल्या.

पालघरमधील झरी येथे ७५ मिलिमीटर, तर साइवन ३५, तलसरी येथे ३८ मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. दावडी घाटमाथ्यावर ८२ मिलिमीटर, तर डुंगरवाडी ४९ मिलिमीटर, ताम्हिणी ४५, शिरगाव ४२, कोयना ३९ मिलिमीटर पाऊस पडला.

कोल्हापुरातील कडगाव येथे ३१ मिलिमीटर, तर करंजफेन, मलकापूर, आंबा, राधानगरी, सरवडे, कसबा, आवळी, कसबा, गगनबावडा, साळवण, गारगोटी, कराडवाडी, चंदगड, नारंगवाडी, हेरे येथे तुरळक सरी पडल्या. मराठवाड्यात सोमवारी (ता. ९) परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला असून मानवत येथे जोरदार पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT