Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather Update : माण फलटण तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस

Satara Rain : काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी सात वाजेपर्यंत संततधार सुरू होता.

Team Agrowon

Satara Rain News : माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवड, देवापूर, वरकुटे, रांजणी इत्यादी गावांच्या परिसरात शुक्रवारी (ता. २६) दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दुपारी अडीचच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी सात वाजेपर्यंत संततधार सुरू होता.

शुक्रवारी (ता. २६) दुपारी पावसाने सुरुवात करताच उष्णतेचा पारा झपाट्याने खाली आला. संततधार पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. झाडावरील आंबा फळांची गळती झाली असून, अनेक ठिकाणी आंब्याची झाडे मोडून पडली.

शेतातून काढून उन्हात वाळत घातलेला कांदा व मका कणसे पावसाने भिजून गेली. दरम्यान, गुरुवारी फलटण शहरासह, गिरवी, तरडफ परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

गिरवी व परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. उपळवे (सावंतवाडी) येथे विजेच्या धक्क्याने बजरंग साहेबराव फडतरे यांच्या सहा शेळ्या दगावल्या आहेत. तरडफ येथे अशोक सदाशिव गोडसे यांची एक गाय दगावली आहे.

तलाठी मंडलाधिकारी यांनी दोन्ही ठिकाणचे पंचनामे केले असून, महसूल खात्याच्या माध्यमातून नियमाप्रमाणे मदत मिळेल. तथापी गाय व शेळ्या दगावल्याने दोन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

तरडफ येथे शेतातील छप्पर वजा निवारे, पत्रा शेड पडले आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT