Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरूच

Rain News : राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्‍हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीचे पाणी शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. शनिवारी(ता.२०) दुपारी बारा वाजेपर्यंत ७६ बंधारे पाण्याखाली गेले होते.

कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३५ फूट ११ इंचापर्यंत गेली आहे. राधानगरी धरणातून सध्या १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर, आलमट्टी धरणातून सुरू असलेला ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून ८० हजारांहून अधिक क्युसेक करावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे.

राधानगरी धरण ७० टक्के, तर काळम्मावाडी धरण ५२ टक्के भरले आहे. दरम्यान, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टीने झोडपले आहे. राधानगरी धरणातून सुरू असलेला १४०० क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भुदरगड तालुक्यात सरासरी ६२ मिलिमिटर इतका पाऊस झाला. तालुक्यात कडगाव-पाटगाव परिसरात सर्वाधिक सरासरी ११० मिलिमिटर इतका पाऊस नोंद झाला. वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, करडवाडी हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. तुळशी नदीवरील आरे, बीड बंधारा पाण्याखाली गेला आहे. भोगावती नदीवरील बहिरेश्वर कोगे बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून ५४ हजार क्युसेक्सने पाणी कर्नाटकात सोडले जात आहे. पावसामुळ कोंडोशी लघू पाटबंधारे तलाव शुक्रवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्याच्या सुरक्षेसाठी धरणातून विसर्ग सुरू ठेवला आहे.

पाणीपातळी ८९.२० मीटर आहे. धरणात ९७.४८ दलघफू पाणीसाठा झाला आहे. झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघूपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे धामणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. या प्रकल्पाची ९९० सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

Cotton Processing Season: कापूस प्रक्रियेला दसऱ्यानंतर वेग येणार

SCROLL FOR NEXT