Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८४ टक्के, ‘मासोळी’मध्ये १८ टक्के पाणीसाठा

Dam Water Stock : मागील १० दिवसात पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : मागील १० दिवसात पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २८) करपरा मध्यम प्रकल्पामध्ये २०.९४ दलघमीनुसार ८४ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ४.९७८ दलघमीनुसार १८ टक्के पाणीसाठा होता.

येलदरी धरणामध्ये ६१२५.७३१ दलघमीनुसार ७६ टक्के, सिध्देश्वर धरणात ४४.९६८ दलघमीनुसार ५५.५४ टक्के निम्न दुधना प्रकल्पामध्ये १३७.८८४ दलघमीनुसार ५७ टक्के पाणीसाठा होता.

परभणी जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ६४ मिलिमीटर पावसाची तूट झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. परंतु गुरुवार (ता. १७) ते रविवार (ता. २७) या १० दिवसांच्या कालावधीत जुलै महिन्याची सरासरी ओलांडली.

जिल्ह्यातील ३९ मंडलात अतिवृष्टी झाली. पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २१) करपरा मध्यम प्रकल्पात ५.१५ दलघमीनुसार २१ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पाणलोटात जोरदार पाऊस झाल्यामुळे सोमवारी (ता. २८) सकाळी २०.८९४ दलघमीनुसार ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.

मागील आठवड्यात मासोळी मध्यम प्रकल्पांत ४.५३४ दलघमीनुसार १६.७१ टक्के पाणीसाठा होता.त्यात १८ टक्के पर्यंत वाढ झाली असून गुरुवारी (ता. १७) पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये ५२ टक्के तर सिध्देश्वर धरणात २४.४८ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ३६.५४ टक्के पाणीसाठा होता.

जोरदार पावसामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात २३ टक्के,सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यात ३१.०६ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात १९ टक्के वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २८) गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधाऱ्यामध्ये ६४ टक्के, तारुगव्हाण येथील बंधाऱ्यामध्ये ८४ टक्के, मुद्गगल येथील बंधाऱ्यामध्ये ८४ टक्के,मुळी येथील बंधाऱ्यामध्ये ८२ टक्के, डिग्रस येथील बंधाऱ्यामध्ये २०.९४ टक्के पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT