Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : वळवाने भाजीपाला भुईसपाट, दोडका, वांगी, टोमॅटोचे मोठे नुकसान

Sugarcane Crop Damage : अनेक ठिकाणी आडसाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दोडका, वांगी, टोमॅटो, काकडी पिकांना याचा जोरदार फटका बसला आहे.

शिरोळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या वळवाची भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे दोडका, टोमॅटो, वांगी यांसह विविध भाजीपाला भुईसपाट झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात यंदा वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाल्याच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी आडसाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

मंगळवारच्या अवकाळीमुळे शिरोळ तालुक्याच्या हेरवाडमधील भाजीपाला पिकावर परिणाम झाला आहे. काही शेतकऱ्यांचे दोडक्याचे प्लॉट भुईसपाट झाले आहेत.

टोमॅटोच्या शेतात पाणी साचले आहे. भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी लावलेल्या तारकाटी भुईसपाट झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ढगाळ व उष्ण हवामानामुळे भाजीपाला पिकावर वेगवेगळ्या प्रकारची कीड निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.

चंदगड तालुक्यात वळीव पावसाचा फटका मेंढपाळ, वीट व्यावसायिकांना बसला. वादळी वारा, विजांचा कडकडाट झाल्याने धनगर बांधव, वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. कर्नाटक येथून चाऱ्याच्या शोधार्थ आलेल्या धनगर बांधवांना रात्री झालेल्या पावसामुळे मेंढराना रात्रभर पाण्यात बसण्याची वेळ आली. कूर, मिणचे, हेदवडे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. पावसाने पिकांना जीवदान मिळाले, पण मेंढपाळ व वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

Banana Export: केळीचे सुकले बाग!

Community Development : ९ वर्षांत १९ वनराया, ४५ हजार झाडे जगवली!

Local Body Elections : उमेदवारी अर्जवाटपाची सर्वच पक्षांत लगीनघाई

SCROLL FOR NEXT