Summer Heat Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave Alert : पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, तापमानाचा पारा चढू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Palghar News : नागरिकांनी सतर्क राहून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा आणि उष्माघात टाळा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. उष्माघातामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी दुपारच्यावेळी (१२ ते ४ दरम्यान) बाहेर पडणे टाळावे. शेतमजूर, बांधकाम मजूर, कारखान्यातील कामगार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, मधुमेह व हृदयरोग असलेले रुग्ण यांना उष्माघाताचा जास्त धोका असतो.

त्यांनी विशेष काळजी घ्यावी. शेतातील किंवा बाहेरील इतर कामे करणाऱ्यांनी दुपारच्या वेळी अधून मधून सावलीत विश्रांती घ्यावी, किंवा सकाळी व संध्याकाळी कामास प्राधान्य द्यावे. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी ही लक्षणे जाणवली, तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

वाणगाव : पालघरमध्ये बुधवारपर्यंत (ता. १२) आर्द्रतेत घट आणि तापमानात वाढीचा इशारा देण्यात आला. सोमवारी (ता. १०) येलो अलर्ट देण्यात आला असून, पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

त्यामुळे वातावरण उष्ण व दमट राहील, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान शास्त्रज्ञ रिजवाना सय्यद यांनी दिली. अधिक उष्णतेमुळे जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे कोसबाड केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT