Health  Agrowon
ॲग्रो विशेष

Health Center : आरोग्य उपकेंद्र ४ वर्षांपासून बंद

Maharashtra Health Care : संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द, जांबूत बुद्रुक या गावांसह आदी वाड्या-वस्त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य अशी आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली.

Team Agrowon

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द, जांबूत बुद्रुक या गावांसह आदी वाड्या-वस्त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य अशी आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली.

मात्र चार वर्षांपासून ही इमारत बंद अवस्थेत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना आठ किलोमीटर अंतरावरील साकूर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी इमारत शोभेची बाहुली बनली आहे.

जांबूत बुद्रुक गावांतर्गत जांबूत खुर्द, शेंगाळवाडी, धनगरवाडा आदी वाड्या-वस्त्या आहेत. तीन हजार लोकसंख्या असून आदिवासी, अल्पसंख्याक बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. येथे आरोग्य उपकेंद्र झाले तर नागरिकांना साकूरला जावे लागणार नाही म्हणून जांबूत खुर्द येथे लाखो रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटनही झाले. त्यामुळे आता साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागणार नसल्याचा आनंद नागरिकांना झाला.

परंतु, हा आनंद क्षणिक ठरला. गेली चार वर्ष ही इमारत बंद अवस्थेत आहे. मात्र, आजपर्यंत या इमारतीकडे कोणीच लक्ष दिले नाही. आरोग्याचे काही प्रश्न उद्भवल्यास आजही या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आठ किलोमीटर अंतर असलेल्या साकूर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी जागा नसताना ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आणि त्याचे बांधकाम होऊन मोठ्या थाटामाटात उद्घाटनही झाले. मात्र गेल्या चार वर्षांपासून आरोग्य उपकेंद्र बंद आहे. हे उपक्रेंद्र सुरू व्हावे म्हणून ग्रामपंचायतीने वारंवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारी केला आहे. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे आरोग्य उपकेंद्र सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.
सुभाष डोंगरे, उपसरपंच, जांबूत खुर्द

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT