आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, लाल मिरची आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीन दर टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचे दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव देशात ४ हजार ८०० रुपयांपासून ५ हजार २०० रुपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्रात ५ हजार १०० ते ५ हजार २५० रुपयांच्या दरम्यान प्रक्रिया प्लांट्सची खरेदी सुरु आहे. तर बाजार समित्यांमध्ये भाव ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे हमीभावाने खरेदी सुरुच आहेत. भावात सुधारणा होत असल्याने सोयाबीनची हमीभावाने खरेदीही कमी होत आहे. सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसातील सुधारणा कायमदेशातील बाजारात कापसाच्या दरात सुधारणा कायम आहे. जानेवारी महिन्यात कापसाची आवक कमी झालेली आहे. दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला आहे. बाजारातील आवक कमी झाल्याने दरही वाढत आहेत. आज अकोट बाजारात कमाल ८२०० रुपयांचा भाव मिळाला. देशातील इतरही काही बाजारांमध्ये यादरम्यान कमाल दर पोचला आहे. मात्र सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजारांच्या दरम्यान आहे. कापसाची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: मेथीचे दर घसरले; सोयाबीन, बाजरीचे दर टिकून, कापूस आवक घटली, तर तुरीचे दर दबावातच.गव्हाचे दर स्थिरदेशातील बाजारात गव्हाला सध्या स्थिर मागणी आहे. याचा परिणाम गव्हाच्या दरावर होऊन गव्हाचे भावही स्थिरावले आहेत. गव्हाला बाजारात सध्या गुणवत्तेनुसार सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सरकार स्टाॅकमधील गव्हाची विक्री पुढील काही दिवसांमध्ये विक्रीची निविदा काढणार आहे. सरकार गहू विक्रीचा भाव काय काढणार, याची बाजाराला प्रतिक्षा आहे. सरकारने गव्हाचा चांगला साठा आहे. देशातील बाजारातही पुरवठा चांगला आहे. सरकारने स्टाॅक लिमिट कायम ठेवले आहे. त्यामुळे गव्हाचे दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: टोमॅटोचे दर टिकून; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दरात वाढ, मका भाव दबावातच तर कांदा दरात चढ उतार.लाल मिरचीची आवक वाढलीदेशातील बाजारात लाल मिरचीची आवक वाढली आहे. नव्या मालाची आवक वाढल्याचा परिणाम दरावरही दिसून आला. लाल मिरचीला सध्या बाजारात सरासरी १५ हजार ते १८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा अनेक भागात मिरची पिकाला पावसाचा दणका बसला होता. तसेच कीड-रोगांमुळेही काही भागात उत्पादन कमी झाले आहे. यामुळे नव्या मालाची आवक वाढत असतानाही लाल मिरचीच्या दरात अपेक्षेप्रमाणे घट दिसून आली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. लाल मिरचीची बाजारातील आवक पुढील काळात आणखी वाढेल. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..हरभरा दबावातचनवा हरभऱ्याची बाजारात आवक वाढण्याला २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र काही ठिकाणी आगाप लागवडी झालेल्या हरभऱ्याची आवक बाजारात सुरु झाली आहे. तरीही बाजारातील आवक कमीच आहे. मात्र तरीही हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. हरभऱ्याला बाजारात सध्या सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. देशात आयात हरभऱ्याचा साठाही आहे. तसेच पुढील काळात नव्या मालाची आवकही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.