Linseed Agrowon
ॲग्रो विशेष

Linseed Health Benefits : आरोग्यदायी जवसापासून बर्फी, चटणी

Linseed Products : आकाराने लहान पण शक्तिशाली बिया म्हणून जवस ओळखले जाते. जवसाला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. जवस बियांमध्ये तंतुमय पदार्थ, ॲन्टिऑक्सिडन्ट्‍स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड याचे प्रमाण मुबलक असते.

कृष्णा काळे

Linseed Processed Food : आकाराने लहान पण शक्तिशाली बिया म्हणून जवस ओळखले जाते. जवसाला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. जवस बियांमध्ये तंतुमय पदार्थ, ॲन्टिऑक्सिडन्ट्‍स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड याचे प्रमाण मुबलक असते. तसेच जीवनसत्त्व ब, मॅग्नेशिअम आणि मँगेनीज यांचे प्रमाण जास्त असते. जवस बियांमध्ये अधिक प्रमाणात असलेले ओमेगा-३, स्निग्ध आम्ल, लिग्नीन, तंतुमय पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

जवस बियांतील पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जवस बिया बारीक करणे अत्यंत आवश्यक आहे. जवसामधील प्रथिने रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. जवसापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. लाडू, चटणी, बर्फी, चिक्की, बिस्किटे यासारखे पदार्थ तयार करून जवसाचे मूल्यवर्धन करता येते.

अलिकडच्या काळात जवसाचा आहारातील वापर कमी झाला आहे. त्यासाठी मुल्यवर्धन अत्यंत उपयुक्त ठरते. जवस चटणी, चिक्की यांचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून अनेक आरोग्यदायी फायदे घेता येतात.

आरोग्यदायी गुणधर्म

ओमेगा -३ फॅटी ॲसिड जवस बियांमध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेंदूचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

जवस बियांमधील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत करतात. ते खराब कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रित ठेवतात.

संशोधनानुसार जवसाच्या बियांमध्ये आढळणाऱ्या लिग्नीनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

जवस बिया जळजळ, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्य चांगले राखण्यास फायदेशीर ठरते.

त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी जवस बिया उपयुक्त ठरतात.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यात जवस बिया उत्तम भूमिका निभावतात. जवस बियांमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. जवस बियांच्या सेवनामुळे भूक लागल्याची इच्छा कमी होऊन वजन नियंत्रित करण्यास मदत होते.

जवसामध्ये प्रथिने, कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

जवसामुळे हार्मोनल बॅलन्स राखले जातो.

पोषक घटक (प्रति १०० ग्रॅम)

कॅलरीज ५३४ कॅलरी

प्रथिने १८.३ ग्रॅम

कर्बोदके २८.९ ग्रॅम

स्निग्धांश ४२.२ ग्रॅम

तंतुमय पदार्थ २७.३ ग्रॅम.

बर्फी

साहित्य ः जवस पावडर ३०० ग्रॅम, भरडलेले अक्रोड १०० ग्रॅम, बारीक केलेले काजू, बदाम प्रत्येकी १५० ग्रॅम, वेलची पावडर ५ ग्रॅम, साखर २७० ग्रॅम, पाणी.

कृती ः प्रथम जवस बिया भाजून घ्याव्यात. त्यानंतर त्याची पावडर करावी. एका पॅनमध्ये अक्रोड, बदाम आणि काजू एकत्र करून हलक्या हाताने भाजून घ्यावेत. एका कढईत साखर आणि पाणी घेऊन गॅसवर १५ मिनिटे उकळून पाक तयार करावा.

त्यानंतर गॅस बंद करून सर्व भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, वेलची पावडर, जवस पावडर साखरेच्या पाकात चांगले मिसळून घ्यावे. तयार मिश्रण एका ट्रेमध्ये पसरून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर पाहिजे त्या आकारात त्याचे काप करावेत.

चटणी

साहित्य ः जवस १०० ग्रॅम, लसूण १० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, मिरची पावडर ३० ग्रॅम, कढीपत्ता १० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम.

कृती ः प्रथम जवस बिया भाजून त्यात लसूण- मिरची पावडर मिसळून घ्यावी. त्यात जिरे, कढीपत्ता मिसळून मिक्सरमधून पावडर तयार करून घ्यावी. तयार चटणी दैनंदिन जेवणात चपातीसह खाऊ शकता. तयार चटणी चविष्ट लागते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT