Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : तुम्ही अजून पाहिलेय काय?...सारखे सारखे वय काढू नका

Sharad Pawar : अनेकजण माझे वय काढतात, माझे वय ८४, ८५ झाले असे म्हणतात. सारखे सारखे वय काढू नका, तुम्ही अजून पाहिलेय काय, हा गडी थांबणारा नाही.

Team Agrowon

Baramati News : अनेकजण माझे वय काढतात, माझे वय ८४, ८५ झाले असे म्हणतात. सारखे सारखे वय काढू नका, तुम्ही अजून पाहिलेय काय, हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

बारामती तालुक्याच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यात शरद पवार यांनी सोमवारी (ता. ८) उंडवडी कप ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. या वेळी पवार म्हणाले, ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली.

मदत करत असताना मी कधीही त्यांचा पक्ष कोणता आहे हे बघितले नाही. मी हे बघितले की ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे धोरण नेहमी राबवले.’

मागे एकदा नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याची इच्छा व्यक्त केली. इथे आल्यानंतर त्यांनी भाषण केले आणि त्या भाषणात त्यांनी सांगितले, की मी हे जे काही घडलो आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे की हे काम कसे करायचे हे मला पवार साहेबांनी बोट धरून शिकवले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत. तसेच, कोणी वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

झारखंड राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांवर टीका केली. आज त्यांना तुरुंगात टाकले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारवर टीका केली त्यांनाही आज जेलमध्ये टाकले आहे, असेही पवार या वेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप

Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार

Drug case: अमलीपदार्थ कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या : हर्षवर्धन सपकाळ

Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली

SCROLL FOR NEXT