Shaktipeeth Mahamarg agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली

Satej Patil : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या सर्व प्रती माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकारांना दिल्या आहेत.

sandeep Shirguppe

Satej Patil Vs Hasan Mushrif : आमदार सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या परिपत्रकावर केलेले वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यांची वक्तव्येही पोरकटपणाचीच आहेत, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (ता. २५) केली. त्यांनी लोकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करू नये, अशी त्यांना सूचना आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुश्रीफ म्हणतात, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या सर्व प्रती माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकारांना दिल्या आहेत. त्या नोटिफिकेशनच्या सर्वच प्रती मी आमदार पाटील यांना पाठवून दिल्या आहेत.

सतेज पाटील यांना आमदार आणि मंत्री म्हणून अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी त्याची शहानिशा करावी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन प्रक्रियेचा तारखांसह तपशीलही त्यांना देऊ शकतो त्याचाही त्यांनी बारकाईने अभ्यास करावा. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द केलेले आहे, यापुढे तो कधीही होऊ देणार नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला हा रस्ता नको आहे, त्यामुळे कोल्हापूर करीता तो रद्द झाला. शेतकऱ्यांची फसवणूक केली हे वाक्य वापरण्यापूर्वी त्यांनी शंभरवेळा विचार करायला हवा. मुश्रीफ असे करू शकतात काय, याबाबतही विचार करायला हवा होता. कारण, आम्हाला शेतकऱ्यांची तर त्यांना गोव्याला जाणाऱ्यांची चिंता असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सतेज पाटील काय म्हणाले...

‘शक्तिपीठ महामार्ग केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. तो केवळ कोल्हापूरपुरता रद्द करता येतो का? १५ ऑक्टोबरचा आदेश असताना तो २३ तारखेला का जाहीर केला. हा महामार्ग कोल्हापूरमधून गोव्याला जाणार आहे. तो मध्येच कसा रद्द होऊ शकतो. आचारसंहिता लागू असतानाही महायुतीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शक्तिपीठ वर्ध्यातून कोल्हापूर-गोवा असा जाणार आहे. कोल्हापुरातील शक्तिपीठ रद्द झाला असेल तर तो मार्ग हवेतून गोव्यापर्यंत जाणार का?

१५ ऑक्टोबरला हा मार्ग रद्द झाल्याची माहिती सांगितली जात असेल, तर तो आत्तापर्यंत जाहीर का केला नाही? आत्ता केला असेल, तर आचारसंहितेता कसा केला, मागील तारीख टाकून काढलेली ऑर्डर आहे का? याची माहिती घ्यावी लागणार आहे असे पाटील म्हणाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT