Hasan Mushrif agrowon
ॲग्रो विशेष

Hasan Mushrif : 'राजू शेट्टींसारखे नेते असले पाहिजेत तरच कारखानदार वळणावर'

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Agriculture News : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाला दोन्ही जिल्ह्यात हिंसक वळण लागत चालल्याने कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील संघर्ष आता टोकाला चालला आहे. अशातच १७ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा अडवणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला यावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिस बघ्याची भुमिका घेणार का? असा प्रतिप्रश्न मुश्रीफ यांनी 'स्वाभिमानी' चे माजी खासदार राजू शेट्टी यांनी फडणवीस यांची सभा उधळण्याचा दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात कर्जे काढून कारखाने एकरकमी एफआरपीची रक्कम देतात, अन्य जिल्ह्यात दोन-तीन हप्त्यात ती दिली जाते. एफआरपीचा कायदा यांच्यामुळेच झाला, त्यानंतर ७०:३३ चा फार्म्युला आला. हे दोन कायदे असताना एक-दोन महिन्यात साखरेचे दर वाढले म्हणून वाढीव दर मागता, कोल्हापूर जिल्ह्यातच हा वेगळा नियम का?,' अशी विचारणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

मुश्रीफ म्हणाले, 'आज कारखान्यांच्या किंमतीएवढी कर्जे त्यांच्यावर झाली आहेत. गेल्या हंगामातील प्रतिटन ४०० रूपयांच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत कारखानदारांनी हे पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. यावर्षीच्या हंगामात कोणी कमी उचल दिली असेल तर ती वाढवण्यास सांगू पण गेल्या हंगामातील शक्यच नाही. आमचे कारखाने तीन महिने चालतात आणि उर्वरित नऊ महिने पगार द्यावा लागतो.

अशामुळे यावर्षी जिल्ह्यातील दोन कारखाने बंद पडतील. फॉर्म्युला ठरला असताना प्रत्येकवेळी तो वेगळा कसा असेल. तोडगा हा काढलाच पाहीजे पण पैशाचेही नाटक करता येत नाही.'

'साखर विक्रीचे आव्हान मी श्री. शेट्टी यांना दिले होते. माझ्या कारखान्याची १२०० टन साखर १५ नोव्हेंबरपूर्वी विकायची आहे. पण त्याला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. याबाबत त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करतो, पण प्रतिसाद नाही. यावर्षीच्या हंगामातील तोडग्याबाबत आमदार डॉ. विनय कोरे व सतेज पाटील त्यांच्याशी बोलत आहेत', असेही मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

शेट्टींसारखे नेते हवेत

"गोकुळ' वरील आंदोलनाबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी मी बोलणार आहे असे सांगू मुश्रीफ म्हणाले, 'शेट्टी यांना तुमचा दत्ता सामंत करू अशी धमकी आली असेल तर ते चुकीचे आहे. शेट्टींसारखे नेते असले पाहिजेत तरच कारखानदार वळणावर राहणार आहेत. शेतकऱ्यांचा आवाज शेट्टी यांच्या माध्यमातून राहिला पाहीजे. असेही मुश्रीफ म्हणाले.'

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

Marathwada Water Storage: मराठवाड्यात ११ मोठ्या प्रकल्पांत १७६ टीएमसी उपयुक्त साठा  

Turmeric Varieties: सरस उत्पादकतेचे हळदीचे वाण विकसित करणार

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

SCROLL FOR NEXT