Rabbi jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Jowar : रब्बी ज्वारी काढणीस सुरुवात

सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिकांची काढणी वेगाने सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात (Rabbi Season) शेतकऱ्यांनी पेरलेल्या ज्वारी काढणीस गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. येत्या काळात ज्वारी काढणीस आणखी वेग येणार आहे. पुणे विभागातील अनेक तालुक्यांत मजुरांची समस्या आहे.

त्यामुळे वाढीव मजुरी देऊन ज्वारीची (Jwari) काढणी शेतकरी करत आहे. काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य काढणी करत असून, काढणी केलेल्या ज्वारीची मशिनच्या साह्याने मळणीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे विभागात सरासरी सात लाख २० हजार २२७ हेक्टरपैकी ४ लाख ३४ हजार ३४७ हेक्टर म्हणजेच ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. यंदा उशिराने झालेल्या पावसामुळे जमिनीत अधिक ओल असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत.

त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून सुमारे दोन लाख ८५ हजार ८८० हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. परिणामी, रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके ही खरिपाची पिके म्हणून ओळखली जातात. त्यामुळे रब्बी हंगामात या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते.

पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. पावसाळ्याच्या शेवटी बऱ्याच काळ वाफसा न झाल्यामुळे आणि बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्यामुळे ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

नगरमध्येही नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी ही ज्वारीमध्ये अग्रेसर आहेत. सोलापूरमध्येही उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून, काढणीस सुरुवात झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा - सरासरी क्षेत्र ---पेरणी झालेले क्षेत्र -- टक्केवारी

नगर -- २,६७,८३४ -- १,४९,१९१ -- ५६

पुणे -- १,३४,३३६ -- ७१,४६६ -- ५३

सोलापूर -- ३,१८,०५७ -- २,१३,६९० -- ६७

एकूण -- ७,२०,२२७ -- ४,३४,३४७ -- ६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT