Sugarcane Cutting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : सिंधुदुर्गातील २९ हजार टन उसाची तोडणी पूर्ण

Sugarcane Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली असून, अद्याप २५ हजार टन ऊस तोडणी शिल्लक आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली असून, अद्याप २५ हजार टन ऊस तोडणी शिल्लक आहे. गेल्या २० दिवसांत तोडणीची गती मंदावली आहे. त्यामुळे तोडणी लांबण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ हजार २०० हेक्टरवर ऊसलागवड आहे. वैभववाडी, कणकवली तालुक्यात ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय मालवण आणि कुडाळ तालुक्यांतदेखील काही प्रमाणात ऊसलागवड आहे.

करूळ घाट काँक्रिटीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतल्यामुळे ऊस उत्पादकांनी नोव्हेंबरमध्येच काम सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील ऊसतोडणी करावी, अशी मागणी केली होती. कारखाना प्रशासनाने देखील त्यांनी दखल घेत हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील ऊसतोडणीवर भर दिला.

सुरुवातीच्या महिनाभरात गतीने ऊसतोडणी झाली. २६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली होती. त्यानंतर गेल्या २५ दिवसांत केवळ ५ हजार टन उसाची तोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

त्यामुळे आतापर्यंत २९ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. अद्याप २५ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे. गेल्या पंचवीस दिवसांत तोडणीची गती मंदावल्याने तोडणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून (ता. २२) करूळ घाटमार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आता ऊसवाहतूक भुईबावडा घाटमार्गे करावी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT