Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : काढणी आलेल्या गहू, कांदा, हरभरा पिकांचे मोठे नुकसान

एकीकडे कांदा, कापूस, गहू, सोयाबीन या शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून शेतीपिकास केलेला खर्च देखील निघण्याची शाश्वती राहिली नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी( ता. 6) मार्च रोजी रात्री आठला कायगाव (ता. गंगापूर) परिसराला चांगलेच झोडपले.

यामुळे काढणी (Crop Harvesting) आलेले गहू, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मोबदला मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यातील अनेक भागात काढणी आलेला गहू भुईसपाट झाला तर हरभरा भिजला. कांद्याला ही मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या शेत बांधावरील आंबा, चिंच, चिकू आदी फळ झाडांचे अतोनात नुकसान झाले.

एकीकडे कांदा, कापूस, गहू, सोयाबीन या शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून शेतीपिकास केलेला खर्च देखील निघण्याची शाश्वती राहिली नाही.

त्यामुळे ते मेटाकुटीला आले आहे.त्यात गत वर्षीची अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

अश्यातच पुन्हा निसर्गाच्या लहरी फटक्याने खरीप सारखे रब्बीत ही शेतीमालाचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

शेती पिकांना हमीभाव नसल्याने आणि निसर्गाच्या लहरी फटक्याने दिवसेंदिवस शेती तोट्याची होत चालली आहे.त्यात ऊन, पावसाळा, आणि हिवाळा या ऋतूत वर्षभर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अवकळा झाली आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गंगापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमीत मुंदडा, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, शेतकरी पांडुरंग वाघ, भाऊसाहेब नवले, गंगाधर वायचळ, इसाभाई पठाण, ज्ञानेश्वर भोजने, बुऱ्हाण पठाण, रशीद पठाण, अस्लम पठाण, कचरू चव्हाण, प्रदीप दारकोंडे, रामेशवर गायकवाड आदींनी मागणी केली आहे.

या भागात पाउस...

अवकाळी पावसाने कायगाव व परिसरातील जामगाव, नवाबपूर, बगडी, ममदापूर, अगरकानडगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, गळनिंब,भिवधानोरा, अगरवाडगाव ,धनगरपट्टी आदी गाव शिवारात हजेरी लावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT