Hailstorm  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm : पूर्व हवेलीत गारांचा पाऊस

Rain Update : उन्हाचा चटका वाढत असताना जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दोन दिवसांपासून सायंकाळी दाणादाण उडवली आहे.

Team Agrowon

Pune News : उन्हाचा चटका वाढत असताना जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दोन दिवसांपासून सायंकाळी दाणादाण उडवली आहे. वाघोली, खराडी, चंदननगर, वडगावशेरी, केशवनगर, मुंढव्याच्या सर्वच भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्यानंतर वाघोली व खराडी भागामध्ये काही वेळ गारांचा पाऊसही झाला.

गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी जोरदार वारे वाहत होते. त्यानंतर काही वेळाने पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोरही वाढला. वाऱ्याची तीव्रता सर्वाधिक होती.

दोन्ही दिवशी सायंकाळी पडलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या कमानी, बोर्ड तुटले तर अनेक ठिकाणी होर्डिंग्जच्या फ्लेक्सचे कापड फाटून ते उडाले. अनेक ठिकाणी वृक्षपडीच्या घटनाही घडल्या.

जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर लावलेल्या लोखंडी कमानीही तुटल्या. अनेक ठिकाणचे बोर्ड वाकले होते. विद्युत खांब व जाहिरातीचे फ्लेक्स तुटून पडले. पुणे-नगर महामार्गालगत काही ठिकाणी पाणी साचले होते.

सायंकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद झाला होता. या दरम्यान विद्युत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT