Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा; ५० एकरांवरील केळीबागा जमीनदोस्त!

Agriculture Loss: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी वादळी वारा, गारपीट आणि जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील ५० एकरांहून अधिक केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, काजू पिकावरही मोठा परिणाम झाला आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना रविवारी (ता.२३) सायकांळी वादळीवारा, गारपीट आणि जोरदार पावसाचा तडाखा बसला. यामध्ये ५० एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. या भागातील काजू पिकाचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने त्याचा आंबा, काजू या पिकांवर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात रविवार सकाळपासून प्रचंड उकाडा होता. दुपारनंतर त्यामध्ये वाढच होत गेली. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, तीन-चार वाजल्यापासून दोडामार्ग तालुक्यात पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वादळीवारा आणि गारपिटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, सासोली, झोळंबे, कोलझर, कळणे, उगाडे, कुडासे, मणेरी, भेडशी, साटेली, परमे, खोक्रल, सोनावल, तेरवण, मेढे, वायंगणतड या गावांना वादळी-वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. वादळाच्या तडाख्यात ५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील ४५ हजारांपेक्षा अधिक केळी मोडून पडल्या. केवळ केळी बागांचे ७० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अदांज आहे.

दोडामार्ग तालुक्यातील काजू पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या भागात सध्या काजू हंगाम सुरू आहे. वादळीवाऱ्याने काजूचा मोहरदेखील गळून पडला आहे. दरम्यान, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी भागांत कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. ढगाळ वातावरणाचा आंबा, काजू पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

दोडामार्ग तालुक्याचे अर्थकारण काजू पिकावर आहे. या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी काजूची मोठी लागवड केलेली आहे. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी काजू हंगाम लांबला होता. त्यामुळे अवघ्या दहा-बारा दिवसांपासून काजू हंगाम सुरू झाला आहे. काजू बी गोळा करण्याचे काम सुरू आहे. परंतु हातातोंडाशी आलेला घास वादळीवारा, गारपीट आणि जोरदार पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वादळीवारा, गारपीट आणि जोरदार पाऊस यामुळे दोडामार्ग तालुक्यातील केळी, काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी नुकसान भरपाई द्यावी.
संजय देसाई, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट, हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक ऊस दर

Soybean MSP: हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेला विलंब 

Indian Economy: भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची झलक

Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा

SCROLL FOR NEXT