Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Hailstorm : खानदेशात गारपिटीसह पावसाने मोठी हानी

Unseasonal Rain Damage : खानदेशात रब्बी हंगाम ऐन भरात असतानाच गारपीट, वादळी पावसाने पिकांची माती केली आहे. शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी व रात्री झालेल्या पावसात जळगावातील रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगाम ऐन भरात असतानाच गारपीट, वादळी पावसाने पिकांची माती केली आहे. शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी व रात्री झालेल्या पावसात जळगावातील रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गहू, मका, हरभरा, कलिंगड, पपई व अन्य भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, पाडळसे, भालोद, पिळोदा भागांत लिंबू व बोरांच्या आकाराएवढ्या गारांचा पाऊस शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस झाला. सुमारे अर्धा तास ते २० मिनिटे जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. यावलमधील यावल, वड्री, कोरपावली, मोहराळा, विरावली, सावखेडासीम आदी भागांतही जोरदार, वादळी पाऊस झाला. यात केळी, कांदा, कलिंगड, गहू, हरभरा, मका आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.

रावेरातील सावदा, विवरे, वाघोदा उटखेडा, भाटखेडा, पातोंडी, विटवा, अजंदे, ऐनपूर, निंबोल, दसनूर, तांदलवाडी, सिंगत आदी भागांतही पावसाने मोठी हानी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, धरणगाव, जामनेर, चोपडा, बोदवड, मुक्ताईनगर, एरंडोल, अमळनेर, पारोळा आदी भागांतही पाऊस झाला.

धुळ्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, नवापूर भागातही पाऊस झाला. काही भागांत जोरदार, तर काही भागांत मध्यम पाऊस झाला. पावसामुळे नंदुरबारातील मिरची वाळवणुकीची प्रक्रिया बाधित झाली असून, बाजार समितीतही शेतीमालाची हानी झाल्याची माहिती मिळाली.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा व लगत मका पिकाची मोठी हानी पावसात झाली आहे. धुळ्यातील कापडणे, लामकानी, देवभाने आदी भागांतही पावसाने कांदा, मका व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. मध्यरात्रीनंतरही अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. गहू पीक निसवणीवर व वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाची देखील चांगली वाढ झाली होती. तसेच अनेक भागात कलिंगडाची लागवड झाली आहे. रोपे वाढत असतानाच पावसामुळे त्यांची हानी झाली आहे. बुरशीजन्य व अन्य रोगांची समस्या पिकांत वाढेल, अशी स्थिती आहे.

पाच हजार हेक्टरला फटका

पाऊस व वादळात खानदेशात सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक हानी यावल व रावेरात झाली आहे. तसेच जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, नंदुरबारातील शहादा, नंदुरबारातही मोठी हानी झाली आहे. प्रशासनाने यावल व रावेरात पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीची माहिती रविवारी (ता.२९) अंतिम करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली जाईल, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT