Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ज्ञानगंगा, ढोरपगाव, मस, मन प्रकल्पांनी दिला सिंचनाला आधार

Water Irrigation Project : ज्ञानगंगा, ढोरपगाव, मस, मन या प्रकल्पांवरून सुमारे ४००० हेक्‍टरवरील पिकांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सिंचनाचा लाभ मिळत असलेल्‍या परिसरातील शेतकरी विविध पिके घेत आहेत.

Team Agrowon

Buldhana News : बुलढाणा जिल्‍ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तालुक्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. तरीही या तालुक्‍यातील ज्ञानंगगा, ढोरपगाव, मस, मन प्रकल्‍प शेतकऱ्यांच्या साह्याला आलेले आहेत. या प्रकल्पांवरून सुमारे ४००० हेक्‍टरवरील पिकांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सिंचनाचा लाभ मिळत असलेल्‍या परिसरातील शेतकरी विविध पिके घेत आहेत.

यंदा ढोरपगाव प्रकल्‍पामध्ये ८० टक्‍के, ज्ञानगंगा ७३ टक्‍के, मन ४१ टक्‍के, तर मस प्रकल्‍पात ८७ टक्‍के पाणीसाठा उपलब्‍ध आहे. दर वर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्‍यान पिकांना पाणी सोडण्यात येते. सध्या या प्रकल्‍पांवरून रब्‍बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याचे नियोजन असून, सिंचन सुविधेचा जवळपास ४००० हेक्‍टरवरील पिकांना लाभ होणार आहे.

खरीप हंगामात ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने महिनाभर ओढ दिल्‍याने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्‍पादन मिळाले नाही. तसेच नुकत्‍याच नोव्‍हेंबर महिन्‍यात आलेल्‍या मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपातील कापूस व तूर पिकांची मोठी हानी झालेली आहे. शेतकरी संकटात असून, अशातच सिंचन सुविधा उपलब्‍ध असलेल्‍या भागातील शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रब्‍बी पिकांच्या लागवडीकडे वळवला आहे.

कालव्याच्या पाण्यावर तालुक्‍यात गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली जात आहे. मन प्रकल्‍पावरून २१ गाव पाणीपुरवठा योजना व खामगाव शहरासाठी नव्‍याने निर्मित करण्यात आलेली वाढीव पाणीपुरवठा योजना देखील याच प्रकल्‍पावर कार्यान्‍वीत करण्यात आली आहे.

चितोडा अंबिकापूर शिवारात आमची शेती आहे. दर वर्षी मस प्रकल्‍पातून परिसरात कालव्याद्वारे पाटबंधारे विभागाकडून डिसेंबर, जानेवारी महिन्‍यात पाणी सोडण्यात येते. यंदा लवकरात लवकर पाणी सोडावे. जेणेकरून पेरणी करण्यात आलेल्‍या गहू व हरभरा पिकाला त्‍याचा लाभ होईल.
संजय घ्यार, माजी सरपंच, चितोडा अंबिकापूर
पाटबंधारे विभागाद्वारे येत्‍या आठवडाभरात सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तरी शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे पाण्याची मागणी करावी. त्‍यानुसार पाणी सोडण्यात येईल.
शरद नागरे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, खामगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेसाठी निधीचा ठणठणाट

Maharashtra Rain Alert: राज्यात विजांसह पावसाची शक्यता

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

SCROLL FOR NEXT