Orange Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Management : संत्रा पीक व्यवस्थापन, खरीपपूर्व नियोजनावर मार्गदर्शन

ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चिखली तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी (ता. २०) संत्रा पीक व्यवस्थापन व खरीप पूर्व मार्गदर्शन या विषयावर ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला.

Team Agrowon

Buldana News : ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चिखली तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी (ता. २०) संत्रा पीक व्यवस्थापन (Crop management) व खरीप पूर्व मार्गदर्शन या विषयावर ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. ॲग्रोवन व चिखली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी उपसंचालक विजय बेतीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण देशपांडे, चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, सरपंच दिगंबर दांदडे, श्री. काळे, भिकनराव आटोळे, संदीप अंभोरे, मंडळ कृषी अधिकारी राजू येवले, श्री. इंगळे, श्री. साळोख व कृषी सहायक उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्री. ढगे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली. संत्रा पीक व कीडरोग व्यवस्थापन या विषयावर डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना संत्रा पिकावर येणारे विविध रोग व कीटकांची ओळख, त्यासाठी नियंत्रण कसे मिळवावे याची माहिती दिली.

श्री. शिंदे यांनी सोयाबीन पिकाची अष्टसूत्री सविस्तरपणे मांडली. सोयाबीन पिकामध्ये उत्पन्न वाढीसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, डोंगरगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सरोदे यांनी केले. आभार मंगेश भुसारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सचिन अवसरमोल, संदीप अंभोरे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

Agriculture Startup: ‘स्‍टार्ट अप’चे अंधानुकरण नको

SCROLL FOR NEXT