E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : विशेष मोहिमेमुळे ई-पीकपाहणी क्षेत्रात वाढ

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) असे दोन दिवस ई-पीकपाहणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे ई-पीकपाहणी क्षेत्रात वाढ झाली असून, शनिवार (ता. १०) पर्यंत ३ लाख २९ हजार २१५ शेतकरी खातेदारांनी ४ लाख १८ हजार ९४७ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी केली आहे.

यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ७९.७९ टक्के, तर शेती खात्यांच्या क्षेत्रानुसार ६९.३३ टक्के क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांनी दिली. परभणी जिल्ह्यात यंदा खरिपाची ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टर पेरणी झाली आहे. सोमवार (ता. ९)पर्यंत जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ५२४ शेतकरी खातेदारांनी ३ लाख ७९ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली होती.

ई-पीकपाहणी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशानुसार गुरुवारी (ता. १२) व शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ३५९ शेतकरी खातेदार असून, त्यांच्या शेती खात्यांचे क्षेत्र ६ हजार ७ हजार ५६९ हेक्टर आहे. सर्व गावांमध्ये ई-पीकपाहणी मोबाइल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व खातेदारांना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वतः गाव नं ७-१२ वर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम स्वरूपात प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार ई-पीक नोंदणी पूर्ण केल्यास १ लाख ६९ हजार ६०० पर्यंत उदिष्ट होते. शनिवार (ता. १४) पर्यंत ३ लाख २९ हजार २१५ शेतकरी खातेदारांनी ४ लाख १८ हजार ९४७ हेक्टरवरील ई-पीकपाहणी पूर्ण केली. चालूपड २ हजार २५० हेक्टर मिळून ई-पीकपाहणी झालेल्या खात्यांचे क्षेत्र ४ लाख २१ हजार १९७ हेक्टर आहे. अजून यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ८ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी बाकी आहे.

परभणी ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका...खरीप पेरणी क्षेत्र...ई-पीकपाहणी क्षेत्र...शेतकरी संख्या

परभणी...९३६५९...७५७१५....५६५९७

जिंतूर...९३९४५...७७७९९...५६२९४

सेलू...६२७४३...४५३८८...३४२१५

मानवत...४३५२५...३४११४...२५०४५

पाथरी...४३४७९...३७४३५...२८८१२

सोनपेठ...३४०९५...२८१५६...२२४९०

गंगाखेड...५८४१२...४२२३५...३५५५४

पालम...४५४९०...३४९३३...३१४५४

पूर्णा...५१२९२...४३१६८...३८७५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT