Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Paddy Farming : वाडा तालुक्यात उन्हाळी भातशेतीकडे कल

Paddy Plantation : तालुक्यातील खैरे-पासोरीपाडा येथील शेतकरी अशोक कोंडू पाटील यांनी पहिल्यांदा उन्हाळी भातशेतीसाठी पुढाकार घेत चार एकर जागेत भातपिकाची लागवड केली आहे.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यातील खैरे-पासोरीपाडा येथील शेतकरी अशोक कोंडू पाटील यांनी पहिल्यांदा उन्हाळी भातशेतीसाठी पुढाकार घेत चार एकर जागेत भातपिकाची लागवड केली आहे.

उन्हाळी भातपीक शेती करण्याची ही माझी पहिलीच वेळ असून, विंधन विहिरीच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे. जया या भात वाणाची लागवड केली असून या शेतीत विशेष नफा झाल्यास यात सातत्य ठेवीन, असे पाटील यांनी सांगितले.

वाडा तालुक्यात भात हे प्रमुख उत्पादन आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा नसतानाही उन्हाळी हंगामातही भातपिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी अशोक पाटील यांनी भाताचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे.

उन्हाळी भातशेती ही कष्टप्रद आणि त्रासाची ठरत असल्याच्या या सबबीखाली येथील शेतकरी शेती करण्याचे टाळत असतात. त्यामुळे गावातील पडीक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, काही गावांतील शेतकरी धाडसाने उन्हाळी भातपिकाची शेती करून नवा आदर्श समाजासमोर ठेवत आहेत.

यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाची पुरती वाट लावली आहे. ऐन पीक तयार होण्याच्या काळात पाऊस पडल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही.

पीक कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत काही शेतकरी उन्हाळी भातशेती करत आहेत.

उन्हाळी हंगामातील भातपिकाची उंची ही पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. भाताचे उत्पादन चांगले येईल, अशी आशा आहे.
- अशोक पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT