Agro Producer Company Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming Program : गटशेती कार्यक्रम राज्यभर राबविणार : आमीर खान

Sahyadri Farmer Producer Company : सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रेरणा घेत गेल्या वर्षीपासून पाणी फाउंडेशनने गटशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रेरणा घेत गेल्या वर्षीपासून पाणी फाउंडेशनने गटशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वेळ, पैसा वाचतो तसेच चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. अनेक समस्या आहेत, पण गटशेतीची राज्यभर व्याप्ती वाढवताना डिजिटल तंत्रज्ञान वापरावर भर दिला जाईल.

यातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळणार असून दोन वर्षांत गटशेतीचा राज्यभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शेतकरी जोडला जाईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी व्यक्त केले.

सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या वतीने ‘फार्मर कप २०२३ पुरस्कार’ सोहळा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉल येथे गुरुवारी (ता. २९) आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमीर खान, किरण राव, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, अभिनेते जॉकी श्राफ, पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकळ, अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

आमीर खान म्हणाले की, आपणाला माती परीक्षण, पाणी, पशुसंवर्धन यामध्ये काम करण्याच्या संधी आहे. कोरोनात अडचणी आल्या, परंतु ऑनलाइन पद्धतीने शेतीशाळा सुरू केल्या. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून सध्या २६ पिकांमध्ये शेतीशाळा घेत आहेत.

‘सह्याद्री’चे विलास शिंदे म्हणाले की, तीस वर्षांपासून गटशेतीचा अनुभव घेत आहे. दुष्काळी भागात या महिला गटांनी मुहूर्तमेढ रोवली आहे. महिला शेतकरी देशासाठी ऊर्जा तयार करत आहे. आपण शेती करत असलो तरी हा देशाचा प्रश्न आहे. जे सरकार करू शकत नाही, ते शेतकरी करू शकतो. त्यासाठी एकत्रित ताकद तयार झाली पाहिजे.

स्पर्धेमध्ये तीन हजार गावे सहभागी

राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांतील ३ हजार गावे स्पर्धेत सहभागी झाले होते. यातील ३९ तालुकास्तरीय विविध पिकांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या शेतकरी गटांना सन्मानचिन्ह, एक लाख रुपये धनादेशाचे चेक देऊन गौरविण्यात आले.

पाणी फाउंडेशनने दिलेले राज्यस्तरीय पुरस्कार

प्रथम पुरस्कार (पंधरा लाख रुपये, सन्मानचिन्ह) : कुंभारगाव अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, कुंभारगाव (ता. करमाळा, सोलापूर)

द्वितीय पुरस्कार (प्रत्येकी पाच लाख रुपये सन्मानचिन्ह) : आई जिजाऊ महिला शेतकरी गट घोडेगाव (छत्रपती संभाजीनगर), उन्नती शेतकरी गट वारंगा तर्फे नांदापूर (कळमनुरी)

राज्यस्तरीय संयुक्त तृतीय पुरस्कार (प्रत्येकी अडीच लाख रुपये, सन्मानचिन्ह) : प्रगती महिला शेतकरी गट, शेरेवाडी (ता. आटपाडी), रॉयल फार्मर शेती गट सौंदे (ता. करमाळा)

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची गरज आणि तंत्र अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचले. याला स्पर्धेची जोड दिल्याने एक चुरस निर्माण झाली. आज गटशेतीच्या माध्यमातून हे काम पुढच्या टप्यापर्यंत पोहोचले आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
फार्मर कपमध्ये तीन हजार गट सहभागी झाले होते. त्यापैकी दोन हजार गटांनी सहभाग नोंदवला होता. यातून लोकसहभाग ही वाढला आहे. तसेच महिलांचा सहभाग अधिक होता. पाणी फाउंडेशनने बनविले ते आता प्रेरणास्त्रोत बनले आहे.
पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव ग्रामीण व विकास यंत्रणा, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

SCROLL FOR NEXT