Group Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Sustainable Farming : गटशेतीमुळे मजुरांच्या टंचाईचा प्रश्‍न कमी होतो. तसेच उत्पादन खर्च घटून शेती उत्पादन वाढते. उमेदच्या माध्यमातूनही गटशेतीचे यशस्वी प्रयोग करता येऊ शकतात.

Team Agrowon

Nanded News : शेतीमध्ये प्रगती साधायची असेल, तर गटशेती करणे ही काळाची गरज आहे. गटशेती ही शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

कै. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त मंगळवारी (ता. १) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग व पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. देविकांत देशमुख, प्रा. शेळके तसेच प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख आदी उपस्थित होते.

गटशेतीमुळे मजुरांच्या टंचाईचा प्रश्‍न कमी होतो. तसेच उत्पादन खर्च घटून शेती उत्पादन वाढते. उमेदच्या माध्यमातूनही गटशेतीचे यशस्वी प्रयोग करता येऊ शकतात. चालू वर्षात किमान २०० शेतीगट तयार करण्याचा निर्धार आहे.

कपाशी वेचणी दरम्यान होणारे नुकसान लक्षात घेऊन १५ ते २० हजार शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर कापूस वेचणी बॅग देण्यात येणार आहेत. तसेच पोखरा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले.

या वेळी राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या ८२ शेतकऱ्यांना प्रमाणिकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. सचिन कपाळे यांनी प्रास्ताविक तर राम कवडे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSEDCL Worker Safety: ‘राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्न राबवा’

IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र

Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

Well Water Tax: विहिरींवरील अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी थांबवा

Iran Airstrikes: इराणवर हवाई हल्ले सुरूच

SCROLL FOR NEXT