Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Crop : उन्हाळी हंगामासाठी भुईमूग वाण अन् वैशिष्ट्ये

Groundnut Season : उन्हाळी हंगामासाठी भुईमूग वाण अन् वैशिष्ट्ये काय आहेत. पाहुयात या लेखातून सविस्तर माहिती.

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्‍वर्या राठोड

Groundnut Varieties and Characteristics : भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी. या काळात रात्रीचे किमान तापमान १८ सेल्सिअसपेक्षा जास्त असते. तसेच पुढे फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत आवश्यक असते. अन्यथा, फुलधारणेवर विपरीत परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास फुलोरा कालावधीत तापमान वाढलेले असते. त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो.

त्यासाठी वेळेत पेरणी पूर्ण करणे आवश्यक आहे. पेरणीसाठी बियाणे प्रमाण हे जातीनिहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार ठरविले जाते. कमी आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी १०० किलो, मध्यम आकाराच्या दाण्याच्या वाणासाठी १२५ किलो, तर टपोऱ्या दाण्यासाठी १५० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे बियाणे वापरावे.

उपट्या जाती 

एसबी ११

प्रसारण वर्ष : १९६५  

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित

पीक कालावधी : ११५ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

कोरडवाहूसाठी उत्तम

दाण्याचे प्रमाण जास्त.

हेक्टरी उत्पादन : १५ ते २० क्विंटल

टीएजी-२४ (TAG २४)

खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित

पिकाचा कालावधी : ११० ते ११५ दिवस

हेक्टरी उत्पादन ः २५ ते ३० क्विंटल

जेएल २८६ (फुले उनप)

प्रसारण वर्ष : २००४      

खरीप हंगामासाठी योग्य.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित

पीक दिवस : ११५ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

मूळ कुजव्या रोगास प्रतिकारक्षम.

फुले येणारा कालावधी जास्त

तेलाचे प्रमाण : ४९ ते ५० टक्के

हेक्टरी उत्पादन : १८ ते २० क्विंटल

टीपीजी-४९ (TPG ४९)

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी योग्य.

जळगाव, धुळे, व अकोला जिल्ह्यांकरिता प्रसारित

पिकाचा कालावधी : १२५ ते १३० दिवस

वैशिष्ट्ये

जाड दाणे

हेक्टरी उत्पादन : २५ ते ३० क्विंटल

टीजी-२६(TG २६)

खरीप व उन्हाळी हंगामासाठी.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित

पिकाचा कालावधी : ११० ते ११५ दिवस

हेक्टरी उत्पादन  ः२५ ते ३० क्विंटल

जेएल ५०१

प्रसारण वर्ष :२००९

खरीप व उन्हाळी हंगामासाठी

म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित

पिकाचा कालावधी : ११० ते ११५ दिवस

वैशिष्ट्ये

तेलाचे प्रमाण ४९ टक्के

दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : ३० ते ३२ क्विंटल

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद्‍ शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT