Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Harvesting : खानदेशात भुईमूग, कांदा काढणी सुरूच

Groundnut Harvesting : कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात भुईमूग, कांद्याची काढणी सुरूच आहे. तसेच उशिरा पेरणीच्या बाजरीची मळणीदेखील सुरू आहे. ऊन तापत असतानाच ही काढणी, मळणीची कामे करून घेताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे.

भुईमुगाची लागवड खानदेशात बऱ्यापैकी होत आहे. ही लागवड डिसेंबर, जानेवारीत करण्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी आगाप लागवड केली. या आगाप लागवडीच्या पिकात काढणी पूर्ण झाली आहे. परंतु उशिरा लागवडीच्या पिकात भुईमूग काढणी सुरूच आहे. खानदेशात सुमारे ७०० हेक्टरवर भुईमूग पीक होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात अधिकची लागवड होती. अन्य भागांतही अनेकांनी भुईमुगाच प्राधान्य दिले होते. तर उशिराच्या कांद्याची लागवडदेखील झाली होती. ही लागवड जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीतही झाली होती. धुळ्यातील साक्री, धुळे व शिरपूर भागासह जळगावमधील यावल, चोपडा भागात अनेकांनी कांदा साठवणुकीच्या दृष्टीने उशिरा लागवड केली. या पिकातही काढणी सुरू आहे. काहींची काढणी पूर्ण झाली आहे.

मजूरटंचाईची समस्या
कांदा, भुईमूग काढणीसंबंधी मजुरांची मोठी गरज असते. त्यात ऊन तापत आहे. सकाळी आठपासून उष्ण झळा बसतात. सकाळी सात ते दुपारी १२ पर्यंत काढणी, मळणीची कामे सुरू आहेत. यामुळे कामे संथ गतीने होत असून, कामाला अधिकचा वेळ लागत आहे. तसेच पावसाच्या भीतीने कांदा, भुईमूग काढणीसाठी धावपळही होत आहे.


चाऱ्यावर बाजरी कापणीला
कांदा, भुईमुगासह बाजरीची कापणी, मळणीदेखील सुरू आहे. कापणीलाही पुरेसे मजूर उपलब्ध होत नाहीत. यामुळे शेतकरी कणसे काढून चारा मोफत देण्याच्या अटीवर अनेकांना बाजरी कापणीला देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे बाजरी कापणी, मळणीचे काम बऱ्यापैकी होत आहे. खानदेशात या आठवड्यातही मळणी, कापणी व काढणीची कामे सुरू राहतील, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT