Pankaja munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Pankaja Munde : पर्यावरणपूरक वातावरणासाठी प्रयत्न करणार

Environment Department : जालना जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे. याठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Team Agrowon

Jalna / Chh. Sambhajainagar News : जालना जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे. याठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देवून, पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट तसेच राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. २६) आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

शिरसाट म्हणाले, की निधीचा विनियोग जनहिताच्या दृष्टीने आवश्यक कामांसाठी करा. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा. त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा. सौर ऊर्जा, शाळा बांधकामे यासारखी कामे तसेच पोलिस दलाचे अत्याधुनिकरण याबाबींना प्राधान्य द्यावे.

विभागनिहाय जिल्ह्यात सुरु असलेले महत्त्वाचे प्रकल्प, तसेच त्या प्रकल्पांची सद्यःस्थिती, संभाव्य अडचणी त्यावर काढावयाचा तोडगा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेला निधी, त्यानिधीतून होणाऱ्या कामांची सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी जिल्हा नियोजन, जिल्ह्यातील प्रकल्प, रेशीम, मॅजिक इनक्युबेशन, प्रादेशिक मनोरुग्णालय, ड्रायपोर्ट आदींचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून आढावा घेतला. तसेच पर्यावरण विभाग, पशुसंवर्धन विभाग यांचा आढावा घेत. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांची जाणून घेतल्या.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा प्रशासन, सर्व उपजिल्हाधिकारी, मनपा प्रशासन, महसुल संघटना, सरपंच संघटना आदींनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.श्रीमती मुंडे म्हणाल्या,विकासाची कामे करण्यासाठी लवकरच नियोजन समिती तयार होईल.विकासाचे काम करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. पालकमंत्री म्हणून कायदे व नियमाच्या चौकटीत सामान्य जनतेसाठी काम करणार. यावेळी, सीईओ वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, गणेश महाडीक उपस्थित होते.

पर्यावरण विभागाने आराखडा तयार करावा ः मुंडे

जालना जिल्ह्यातील पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतनकरीता पर्यांवरण विभागाने आराखडा तयार करावा. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पशुधन, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजना, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती द्यावी, मुंडे यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT