Sericulture Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : शेतकऱ्यांना रेशीम शेतीत उत्तम संधी’

Silk Farming : कृषी विभागाकडून पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे येथे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Solapur News : ‘‘जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशी रेशीम आणि डाळिंब शेती फायद्याची ठरेल, यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या, त्यातही रेशीमशेतीत उत्तम संधी आहे,’’ असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी (ता.२९) सांगितले.

कृषी विभागाकडून पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, शीतल चव्हाण, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. व्ही. इंडी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, विभागीय पोस्ट कार्यालयाचे के. नरेंद्र बाबू, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे पवार उपस्थित होते.

श्री. आशीर्वाद म्हणाले, ‘‘डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. डाळिंब हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे आहे. जिल्ह्यात यासाठी पोषक वातावरण आहे. शासनाच्याही योजना त्यासाठी आहेत, त्याचा लाभ घ्यावा.’’

तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन

या कार्यशाळेमध्ये खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयावर प्रमुख तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. त्यात ऊस पिकांमधील हुमणी किडीचे नियंत्रण, उसाचे पाचट व्यवस्थापन, खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान, सीआरए पद्धतीने फळबाग लागवड, सुपर केन पद्धतीने ऊस रोपवाटिका स्थापन करणे,

बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड, बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, खरिपातील प्रमुख पिके तूर, उडीद, सोयाबीनचे उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकांमधील गोगलगायींचे नियंत्रण यांसह जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाची मोहीम इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT