Bribe  Agrowon
ॲग्रो विशेष

Gramsevak Bribe News : ग्रामसेवकाला एक लाखाची लाच घेताना अटक

Arrest In Bribe : वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील विविध विकासकामांच्या बिलापोटी १ लाख ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील विविध विकासकामांच्या बिलापोटी १ लाख ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी त्रंबकरोडवरील पंचायत समिती आवारात केली. अनिलकुमार मनोहर सुपे,(४६) असे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांनी वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायत अंतर्गतचे निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्यादित (मु. पो. आंबोली, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) चे नावे वाढोली गावातील विविध कामे घेतलेली होती. ही कामे तक्रारदाराने विहित कालावधीमध्ये पूर्ण केली आहेत.

काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली. मात्र २ लाख ९९ हजार ७७६ रुपये या रकमेचे बिल हे वाढोली ग्रामपंचायतीकडून मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदाराने ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली. हे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापूर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे.

या बिलाचे बक्षीस म्हणून ७० हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे ४ हजार रुपये अशा एकूण १ लाख ४ हजार रुपयांची ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदारकडे बुधवारी (ता.२९) मागणी केली. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने याबाबत पडताळणी केली.

त्यात तथ्य आढळून आले. सुपे याने गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी त्र्यंबकेश्वर रोडवरील पंचायत समिती येथे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदारास बोलाविले. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून सुपे यास रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT