Tomato Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Grafting : टोमॅटोत जिवाणू मर नियंत्रणासाठी ग्राफ्टिंगचा चांगला पर्याय

Tomato Farming : बुरशीजन्य रोग तसेच सूत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.

Team Agrowon

Nashik News : बुरशीजन्य रोग तसेच सूत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. याच अनुषंगाने टॉमेटो लागवडीत रोगनियंत्रण, प्रामुख्याने जिवाणू मर नियंत्रणासाठी ग्राफ्टिंग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. याचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी दिला.

‘ॲग्रोवन’ व ‘एचडीएफसी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २५) गणपती मंदिर, गिरनारे (ता. जि. नाशिक) येथे आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘भाजीपाला कीड-रोग व्यवस्थापन’या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. उगले बोलत होते. प्रमुख पाहणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, एचडीएफसी बँकेचे गिरनारे शाखेचे व्यवस्थापक उल्हास गोडसे होते. याप्रसंगी सरपंच किरण कोरडे उपस्थित आहेत.

प्रा. उगले म्हणाले, की टोमॅटो लागवड करताना सुरुवातीच्या अवस्थेत भरखते टाकताना अन्नद्रव्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. रासायनिक खतासमवेत जमिनीत असणाऱ्या कीडी-रोग यांच्या नियंत्रणासाठी शेणखतामध्ये मेटारायझियम, बिव्हेरिया यासारखे जैविक कीडनाशक मिसळून घ्यावेत. जेणेकरून जमिनीतून पसरणाऱ्या हानिकारक किडीचा बंदोबस्त होईल. सूत्रकृमीसारख्या मुळावर गाठी नियंत्रित करण्यासाठी पेसिलोमायसिसचा वापर शेणखतात करता येईल.

गोडसे म्हणाले, की शेतातील उत्पादन खर्च व येणारे उत्पन्न हे विचारात घेतले पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्थ साक्षर होऊन शेतीसाठी भांडवल, योग्य ती गुंतवणूक याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या चर्चासत्रासाठी गिरणारे परिसरातील शेतकरी यांचा के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत व कृषिकन्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी केले. आभार वैभव कुशारे यांनी मानले.

जिल्ह्यात मका, सोयाबीन व भात ही प्रमुख पिके आहेत. त्यामुळे उत्पादनक्षम वाण निवड, सिंचन व खत व्यवस्थापन, पेरणीची सुधारित पद्धत यासह प्रामुख्याने पेरणीपूर्व बीज प्रक्रिया महत्त्वाचे आहे. त्यामुळे मररोगाचे नियंत्रण शक्य होते. त्यामुळे पेरणीपूर्व बियाण्यास शिफारशीत घटकांची बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले. या वेळी महाविस्तार एआय, विविध कृषी विभाग योजना यासंबंधी सविस्तर माहिती दिली.

कीड नियंत्रणासाठी सांगितले पर्याय

कीड नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळ्यांचा वापर, कमी खर्चात कीडनियंत्रण शक्य

फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी कीडनाशकाचा वापर करताना कीटकनाशकांची कार्यप्रद्धती गट यावर अभ्यास करून निर्णय घ्यावा.

करपा रोग नियंत्रणासाठी लागवडीपासून स्पर्शजन्य बुरशीनाशक विशेषतः कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

Cashew Truck Seized : कर चुकवून निघालेले काजूचे ट्रक ताब्यात

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

SCROLL FOR NEXT