Tanker Free Village  Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker-Free Village : गोविंदपुरी गाव झाले टँकरमुक्त

Jal Jeevan Mission : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन योजने’अंतर्गत नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुरी येथील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मिटला आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन योजने’अंतर्गत नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुरी येथील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मिटला आहे.

गेल्या सात वर्षांपासून या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ७ एप्रिलपासून गावात नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.या बदलामुळे गाव ‘टँकरमुक्त’ बनले आहे.

गोविंदपुरी हे सुमारे ४०० लोकसंख्येचे गाव असून, त्याची भौगोलिक रचना जमीन सपाटीपासून तब्बल १०५ मीटर उंचावर आहे. त्यामुळे या उंच भागात पाणी पोहचवणे हे मोठे तांत्रिक आव्हान होते. यासाठी तीन फेज वीजपुरवठ्याची आवश्यकता होती; परंतु यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नव्हती.

ही अडचण लक्षात घेऊन पंचायत समिती नाशिकच्या गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे यांनी पुढाकार घेत पंचायत समिती स्तरावरील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून विशेष तरतूद करून १०० अश्वशक्तीचा विद्युत रोहित्र गावात बसवण्यात आला.

या महत्त्वपूर्ण यंत्रणेमुळे जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यात आली. या रोहित्राच्या साहाय्याने १५ अश्वशक्तीचा जलपंप कार्यान्वित करण्यात आला आणि शेवटी गावात नळाद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुरू होऊ शकला.

समन्वयातून शाश्वत पाणीपुरवठा होण्यास मदत

योजनेची अंमलबजावणी केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर व्यवस्थापनदृष्ट्याही एक उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व लोकसहभागातून या उपक्रमात गती प्राप्त झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही पाणी टंचाईपासून मुक्त होण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

परिणामी, गोविंदपुरीसारख्या उंचावरील गावातही शाश्वत पाणीपुरवठा होण्यास मदत झाली आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद देसले यांनी योजना पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांशी समन्वय साधला असून सरपंच भारती मनोहर खोडे, ग्रामपंचायत अधिकारी गंगाराम लहानु गायकवाड मक्तेदार अभिषेक पाटील व महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आदींनी याकामी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेकडून ९४९ कोटींचा कर्जपुरवठा

Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर

SCROLL FOR NEXT