Maharashtra Kesari Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari : कुस्तीला सरकार पुनर्वैभव प्राप्त करून देईल

Murlidhar Mohol: अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.

Team Agrowon

Ahilynagar News : ‘‘अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळेस कुस्तीला सोन्याचे दिवस होते, मात्र आता वलय कमी होत आहे.

त्यामुळे कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठीच सरकार आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ काम करेल,’’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.अहिल्यानगर येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र केसरी व ६७ वी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे.

वाडिया पार्क येथील स्व. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी येथे कुस्तीसाठी उभारण्यात येत असलेल्या मैदानात मंत्री मोहोळ यांच्या हस्ते आखाड्याचे मातीपूजन झाले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, हिंदकेसरी योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, माजी आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप, अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, गुलाब बर्डे, प्रा. डॉ. संतोष भुजबळ, नीलेश मदने उपस्थित होते.

प्रवीण घुले, बापू थेटे, अनिल गुंजाळ, बाळासाहेब वाघ, शंकर खोसे, धनंजय खोसे, सुरेश आंबेकर, सोमनाथ राऊत, प्रमोद गोडसे, युवराज करंजुले, संजय शेळके, मिलिंद जपे, अशोक घोडके, बंडू शेळके, उमेश भागानगरे, अनिल वाणी, अनिल वाघ, दिलीप झिंजुर्डे, महेश लोंढे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT