Kharif Cultivation: खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये नरखेड तालुक्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख नगदी पिकांवर भर देत उत्पादकता वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हवामानातील बदल, बाजारपेठेतील मागणी आणि शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले..कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्यात कापूस २५ हजार हेक्टर, सोयाबीन ८ हजार हेक्टर, तूर ६ हजार ३०० हेक्टर, मका ३ हजार हेक्टर, भुईमूग ६०० हेक्टर आणि भाजीपाला १ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे. पारंपरिक पिकांसोबत उत्पादनक्षमतेत वाढ साधण्यावरही विभागाचा भर राहणार आहे. .Agriculture Planning: मराठवाड्यात यंदा खरिपात कपाशी, सोयाबीनचे ७८.७३ टक्के क्षेत्र प्रस्तावित.यंदा कापसाची सरासरी उत्पादकता ६०२ किलो, सोयाबीन ९४० किलो आणि तूर १,२९० किलो प्रति हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी सुधारित बियाण्यांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन, मृदा परीक्षण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे..Agriculture Planning: एल निनोच्या आव्हानावर नियोजनातून मात करा : लांजेवार.दरम्यान, कृषी विभागाचे नियोजन स्वागतार्ह असले तरी दर्जेदार बियाणे, खते आणि कीडनाशके वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. तसेच बदलत्या हवामानाचा विचार करून पीक विविधीकरण आणि विज्ञानाधारित शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रस्तावित ध्येय कशाप्रकारे गाठले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..यंदा क्षेत्रवाढीबरोबरच उत्पादकता वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार बियाणे, खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षण उपायांचा अवलंब केल्यास निश्चितच चांगले उत्पादन मिळेल.- कार्तिक कोळी, तालुका कृषी अधिकारी, नरखेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.