Agricultural Machiner: मागील दशकभरात जव्हार परिसरात आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. यात प्रामुख्याने सुधारित बी-बियाणे, खते, औषध फवारणी या बाबींचा समावेश होऊ लागला आहे, अशातच राज्य शासनाच्या निरनिराळ्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेली यांत्रिक अवजारे ही अनुदानामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक सवलत मिळत आहे. .या सगळ्यात पाॅवर ट्रिलर या अवजारावरील अनुदानामुळे अधिक पसंती मिळत असून, तालुक्यात सर्रास शेतकरी पाॅवर ट्रिलरचा वापर करून शेतीची मशागत करत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम वाचून खर्चाची बचत हाेत आहे..Modern Agriculture Techniques: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून संत्रा उत्पादन वाढवा.काही वर्षांपूर्वी शेतीचा हंगाम सुरू झाला की, शेतात बैलजोड्या आणि नांगर फिरतानाचे दृश्य हमखास पाहायला मिळायचे. एकाच वेळी एका शेतात दोन-तीन नांगर फिरताना दिसत असत; मात्र आता काळ बदलला आहे. बैलांची मागणी कमालीची घटल्यामुळे उन्हाळ्यात ठिकठिकाणी भरणारे प्रसिद्ध बैलबाजारही आता बंद झाले आहेत. पूर्वी या भागातील बैलबाजार मोठे आकर्षण असायचे; मात्र या बाजारात आता बैलजोडी घेणे परवडत नाही. शिवाय, शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढण्यामागे शासनाचे धोरणही कारणीभूत आहे..Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान.चाऱ्याची टंचाईमुळे शेती करणे खर्चिक होत चालले आहे. अशा वेळी पॉवर ट्रिलर हा फायदेशीर पर्याय ठरत आहे.- चिमा मोरघा, शेतकरी, दादरकोपरा.मनुष्यबळाचा तुटवडा आणि बैलजोडी या गोष्टींचा विचार केल्यास स्वस्त असलेलेपॉवर ट्रिलर वापरासाठी सोपे आहे.- विनोद बुधर, शेतकरी, वावर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.