Land Measurement : Agrowon
ॲग्रो विशेष

Land Measurement : शेतजमीन हिस्से वाटप मोजणी शुल्कात कपात?

Measurement fees : जमिनीच्या हिस्से वाटप मोजणीसाठी यापूर्वी १ हजार ते ४ हजार रुपये प्रति हिस्सा आकरण्यात येत होता. परंतु आता मात्र हेच शुल्क २०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोजणी खर्च कमी होईल, असा दावा केला जात आहे.

Dhananjay Sanap

Land Ownership : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हिस्से वाटप मोजणी शुल्कात कपात रण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी करता येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील हिस्से वाटप मोजणी शुल्काचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असा दावाही केला जात आहे.

जमिनीच्या हिस्से वाटप मोजणीसाठी यापूर्वी १ हजार ते ४ हजार रुपये प्रति हिस्सा आकरण्यात येत होता. परंतु आता मात्र हेच शुल्क २०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीReduced fees खर्च कमी होईल, असा दावा केला जात आहे.

या निर्णयामुळे जमिनीच्या हिस्से वाटप मोजणी २०० रुपयांमध्ये करता येणार आहे. २०० रुपये शुल्क भरून जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेसाठी १ ते ४ हजार रुपये शुल्क आकारले जात होते. परंतु आता मात्र शेतकऱ्यांना २०० रुपयांमध्ये हिस्से वाटप मोजणी करता येणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतजमीन मोजणी नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केलेली आहे. त्यामुळे शेतकरी भूमी अभिलेखाच्या वेबसाईटवर नोंदणी करून कागदपत्रांसह मोजणी शुल्क भरून अर्ज करू शकतो.

राज्यात तीन प्रकारे शेत जमिनीची मोजणी केली जाते. यामध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अतितातडीची मोजणीचा समावेश आहे. या तिन्ही मोजणीसाठीचा कालावधी आणि शुल्क राज्य सरकारने निश्चित करून दिलेली आहेत.

दरम्यान, जमीन मोजणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी गरजेची असते. बहुतांश वेळा जमिनीच्या सीमावरून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. तसेच जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी आणि न्यायालयीन प्रकरणासाठी जमीन मोजणी प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT